सोलापूर - एलिझाबेथ एकादशीच्या माध्यमाने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला. या निमित्ताने चित्रपटसृष्टीत अालो. स्टार कलाकार बनलो. असे असले तरीही आमच्यासाठी अभ्यास महत्त्वाचाच आहे, असे मनोगत एलिझाबेथ एकादशी चित्रपटातील बाल कलावंत सायली भंडारकवठेकर, दुर्गेश बडवे आणि पुष्कर लोणारकर यांनी व्यक्त केलेे. दिव्य मराठीच्या कार्यालयास सदिच्छा भेट देत या बालकलावंतांनी मनमुराद गप्पा मारल्या.
चित्रपट कसा मिळाला, शूटिंगच्या वेळी कशी भांडणं आणि गप्पा होत, शाळा बुडाली तरी ते नुुकसान कसे भरून काढायचे, एकाच वेळी दोन दोन पेपर देऊन कसे छान मार्क मिळविले आदी अनेक पैलू यावेळी उलगडले. कवठेकर प्रशालेत आम्ही शिकतो. त्या शाळेने, पालकांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे दडपण देता काम करण्यास ऊर्जा दिली. त्याने आम्ही छान काम करू शकलो. यावेळी दुर्गेशचे वडील श्रीकांत बडवे आाणि सायलीचे वडील नरेंद्र भंडारकवठेकर हे उपस्थित होते.
आॅडिशनला धीटाईने सामोरे गेले, घरातून साथ मिळाली : सायली भंडारकवठेकर
मीकधीही नाटकात काम केले नव्हते. भरतनाट्यमवर मला लक्ष केंद्रित करायचे आहे. जेव्हा ऑडीशनला आले तेव्हा मी धीटाईने पुढे गेले. आई बाबांनी, छोट्या भावांनी साथ दिली. पुढेही मला जर झेंडूसारख्या किंवा त्यापेक्षा चांगल्या भूमिका मिळाल्या तर नक्कीच पुढे या क्षेत्रात काम करेन. मात्र आधी अभ्यास करणे महत्त्वाचे असल्याने मी सध्या त्यावर जास्त लक्ष देते आहे.
पुढे वाचा.. आपल्याला काय व्हायचे आहे हे लहान वयात ठरवता येत नाही : पुष्कर लाेणारकर