आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजित कामे प्राधान्याने, मुदतीमध्येच पूर्ण करावीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रा सुरळीतपणे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या तयारी उपाययोजना केल्या आहेत. यात्रेशी संबंधित विभागांनी त्यांच्याकडे सोपवलेल्या कामांचे योग्य नियोजन करून ही कामे प्राधान्याने मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
आषाढी यात्रा नियोजनाबाबत बुधवारी आयाेजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, प्रांताधिकारी संजय तेली दादासाहेब कांबळे यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रणजित कुमार म्हणाले, आषाढी यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी झाली आहे. यासाठी संबंधित विभागांनी त्यांच्याकडील कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण मुदतीत पूर्ण करण्यावर भर द्यावा. त्याच बरोबर झालेल्या कामांचा अहवाल उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्याकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्ग, पालखी तळावरील कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबरोबरच अपूर्ण असलेल्या रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत. राज्य परिवहन महामंडळाने चंद्रभागा बसस्थानक येथे मुरुमीकरण करून घ्यावे. तसेच या ठिकाणी पाणी, वीज आणि शौचालयांची व्यवस्था करावी. नगरपालिकेने स्वच्छता, शहरातील अतिक्रमणे, धोकादायक इमारती, पार्किंग, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य पुरेशा प्रमाणात तात्पुरत्या तसेच कायमस्वरुपी बांधण्यात येणाऱ्या शौचालयांच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या.

बैठकीमध्ये नगरपालिका, आरोग्य विभाग, मंदिर समिती, प्रादेशिक परिवहन, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महसूल विभाग, रॉकेल गॅस वितरण, पंचायत समिती, बीएसएनएल अन्य विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. यात्रा कामकाजांबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
सर्व संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थितीत आषाढी यात्रा नियोजन बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पासष्ठ एकर, चंद्रभागा बसस्थानक, जुना अकलूज रस्ता, पालखी मार्ग, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड, दर्शन रांग परिसराची पाहणी केली संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.

आराखड्याचा आढावा
तीर्थ क्षेत्रविकास आराखड्याअंतर्गत करण्यात येत असलेल्या विकासकामांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांनी येथील शासकीय विश्रामगृह येथे खास बैठक घेऊन आढावा घेतला. सर्व संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे, हेलीपॅड, पासष्ठ एकर येथील सुरू असलेली विविध कामे, प्रदक्षिणा मार्गावरील कामे, विद्युतीकरण, शौचालये, पालखी तळ, वाळवंट येथे विद्युत पुरवठा आणि एमटीडीसीकडील कामांचा आढावा घेण्यात येऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पंढरपूर. आषाढी यात्रा नियोजन बैठकीच्या अगोदर बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत वीरेश प्रभू, प्रवीणकुमार देवरे, मनीषा दुबुले, संजय तेली दादासाहेब कांबळे, एस. टी. राऊत आदी .
बातम्या आणखी आहेत...