आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री परतल्यानंतरही बंदोबस्त सुस्तावणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाल्यानंतर पोलिस यंत्रणा सुस्तावते. मात्र, यंदा तसे होणार नसल्याचा विश्वास कोल्हापूर परकि्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय शर्मा यांनी व्यक्त केला. तसेच संपूर्ण यात्राकाळात मी पंढरपुरात राहून बंदोबस्तावर लक्ष ठेवणार आहे. बंदोबस्तासाठी सुमारे चार ते सव्वाचार हजार पोलिस अधिकारी कर्मचारी असतील, असेही त्यांनी सांगितले. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक शर्मा यांनी बुधवारी (दि. ८) बैठकीत बंदोबस्ताचा आढावा घेतला. तसेच शहरातील बंदोबस्ताच्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पोलिस महानिरीक्षक शर्मा म्हणाले, एकादशीदिवशी शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाल्यानंतर सर्वसामान्य भाविकांच्या सुरक्षेकडे पोलिसांचे लक्ष नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यंदा मी येथे मुक्कामास असेन. वारकरी संघटनांच्या मागण्या शासनस्तरावरील आहेत. वारकरी संघटनांचे प्रतिनिधींनाही कायद्याची जाण असून ते वारकरी सांप्रदायाला मानणारे आहेत. ते कायदेशीर मार्गाने याप्रश्नी सरकारशी चर्चा करतील.

- यात्रा काळात पोलिसांच्या राहण्याची विशेष व्यवस्था करू
- संपूर्ण यात्रा पार पडेपर्यंत पोलिस चोखपणे काम करतील
- सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार
- महाद्वार, पश्चिमद्वार येथे स्क्रीनद्वारे भाविकांना सूचना देणार
- सव्वातीन हजार पुरुष महिला पोलिस कर्मचारी, एक हजार महिला पुरुष होमगार्ड, तीन
एसआरपीच्या कंपन्या बंदोबस्तासाठी असतील.
कोल्हापूर परकि्षेत्रातील अधिकारी कर्मचारी तैनात केले जातील. पूर्वी पंढरपुरात चांगले काम केलेल्या आठ ते दहा अधिकारीही निश्चित केले आहेत. पोलिस महासंचालकांकडे जादा बंदोबस्ताची मागणी केली आहे.

- १७५ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी
- २0 महिला अधिकारी
- ५0 वरिष्ठ पोलिस निरीक्षक
- १५ उपविभागीय पोलिस अधिकारी