आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शाह यांच्याकडून मुंबईत बाप्पांचे दर्शन; राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचे आणि वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेतले. मात्र काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मात्र अजुनही काही स्पष्ट झालेले नाही.
 
अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
नारायण राणे यांचा निर्णय तेच जाहीर करतील, सध्या तरी ते काँग्रेसवासीच आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शक्ती मिल विकणे ही सरकारची बौद्धिक दिवाळखोरी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर पकडला आहे. या भेटीवर काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी थेट भाष्य करणे टाळले. 
 
चव्हाण हे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. त्यांच्यासोबत राज्याचे प्रभारी मोहन प्रसाद, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार भारत भालके आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फडणवीस सरकारने केलेली फसवी घोषणा असल्याची टीका करतानाच या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. कर्जमाफीसाठी शक्ती मिल विक्रीला काढण्याची भाषा करणे म्हणजे सरकारचे आर्थिक नियोजन फसले असल्याचे स्पष्ट होते. खरे तर शक्ती मिल विकणे ही सरकारची बौद्धिक दिवाळखोरीच आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही राज्यात विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे बजावत आहोत. ही भूमिका बजावताना राष्ट्रवादीने साथ दिली नाही तरी आम्हीही राष्ट्रवादीवर अवलंबून नाही, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.
बातम्या आणखी आहेत...