आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिव्हिजनमुळे ग्लॅमर पण ग्रामीण भागातच वास्तववादी पत्रकारिता : अशोक वानखेडे, एबीपी माझा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेलिव्हिजनमुळे पत्रकार सर्वदूर पोहोचत असल्याने ग्लॅमर आले. काही तरी नवे शोधण्याची आणि वाचक, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची वृत्ती पत्रकारांनी कायम तेवत ठेवायला हवी. माझ्या जीवनात अनेक बरे-वाईट प्रसंग आले, निर्भीडपणे मी ते हाताळले. लोकशाही मूल्ये रूजवण्यासाठी दिल्ली, मुंबईपेक्षा ग्रामीण, निमशहरी भागातील पत्रकार अधिक झपाटून काम करतात. त्या तुलनेत दिल्लीतील पत्रकारिता कॉपीपेस्ट म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे सांगत होते. "एबीपी माझा'चे वरिष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली). जनता बँक व्याख्यानानिमित्ताने सोलापूर दौऱ्यावेळी ते "दिव्य मराठी' च्या कार्यालयात आले होते. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या पत्रकारितेच्या अनुभवाविषयी दिलखुलासपणे मारलेल्या गप्पांचा हा सारांश....त्यांच्याच शब्दांत...

पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या घेतलेल्या प्रकाशित मुलाखतीचा रंगीन किस्सा
"इंडिया टुडे'चे रिटायर्ड संपादक नारायण होते. ते "चौथा संसार'मध्ये कॉलम लिहायचे. प्रभाकर माचवे "चौथा संसार'चे संपादक होते. त्यांनीच मला दिल्ली कार्यालयात पाठवले होते. तेथूनच माझ्या दिल्लीतील पत्रकारितेची सुरुवात होती. व्ही. पी. सिंग पंतप्रधानपद स्वीकारणार हे निश्चित झाले होते, तो काळ. नारायण स्वामी यांनी मला व्ही. पी. सिंग यांच्या मुलाखतीची कॉपी दिली. नारायण स्वामी यांनी "विदेशी नीती कशी' यावर मुलाखत छापत असल्याचे व्ही. पी. सिंग यांना फोनवरून सांगितले होते. मॉनिफिस्टोमधला फुलस्टॉपही चेंज करता घेतलेली मुलाखत छापून आली. टेलिव्हिजनवर बोलण्यासाठी लोकल शब्द पाहिजेत. बिहार म्हटलं की पिछडा अतिपिछडा हे सर्व शब्द सर्वांना माहीत असतात. आम्ही भूमीहर, पचपनिया असे लोकल फेव्हर घेतो.

शरद पवारांना पाठवलेला हजाराचाड्राफ्ट
शरद पवार यांचे माझे संबंध खूप चांगले आहेत. लता मंगेशकर यांना भारतरत्न मिळाला होता. फोटोग्राफरने जेवताना आम्हाला फोटो हवा असे सांगून लतादीदींचे फोटो घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात पवार आले, फोटोग्राफरवर उखडले, धक्का मारू लागले. मी त्यांना थांबवले. त्यांनी माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यास बोलावून कोणाला इथे बोलावले? असे म्हणून ओरडले. मी म्हणालो, पवारसाहेब तुम्हाला माहीत नाही पार्टीला कोणाला बोलावले ते. रेस्टॉरंटच्या मॅनेंजरला माहिती नसते आपल्या हॉटेलमध्ये कोण आले आहे? दुसऱ्या दिवशीच देना बँकेत गेलो. एक हजाराचा ड्राफ्ट काढला. छोटे पत्र लिहिले. मला माझी स्वत:ची कमावलेली इज्जत आहे. म्हणून मी तुम्हाला हा ड्राफ्ट पाठवत आहे. त्यानंतर बरेच काही झाले.

याकूबला फाशी दिली ती रात्र...
प्रशांत भूषण रात्री न्यायमूर्तींकडे जाणार असल्याचे समोर आले. रात्री दीड वाजता कोर्ट खुलले. तेवढ्यात फोन आला मूव्हमेंट आहे, सीजेंच्या घरी. तेवढ्यात आॅफिसमधून फोन आला, कोर्ट ओपनिंग. दिवाण, प्रतिनिधी मी फोनवर होतो. अँकरला लिगल असेल तर अशोकजी तुम बताओ. मी फोनवर बोलतोय, दाढी करतोय, बोलतोय, बायको पँट घेऊन. गाडीत बसतोय, तोपर्यंत मराठी वाहिनीचे २२ मिस्ड कॉल. त्यानंतर फाशीहोईपर्यंत मी स्टुडिओत होतो. आपल्याला माहिती भरपूर ठेवावी लागते. अनेकदा आपणास डोजर तयार ठेवावे लागते. आज डेथ ही इव्हेंट झालाय.

राज ठाकरेंशी रंगला "सामना'
मी आणि राज ठाकरे एका लाइव्ह शोमध्ये होतो. "नवभारत टाइम्स'च्या प्रतिनिधीने प्रश्न विचारला. राज-उद्धव एकत्र कधी येणार? त्याने एकदम खडा हो जाओ, किस बेवखूबने तुम्हाला पत्रकार केलं? सवाल पुछने नही आता. सगळे चिडीचूप. तेवढ्यात मी एबीपी न्यूजसे जुडा हूँ असे म्हणत त्यांच्याशी संवाद सुरू केला? लगेच हो, मला माहीत आहे, तुम्ही प्रश्न विचारा असे ठाकरे म्हणाले. मी तेवढ्याच उंच स्वरात राज ठाकरे माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नसेल तर नाही म्हणून सांगा? प्रश्न मी विचारणारच. राज-उद्धव दोघे एकत्र कधी येणार? तुमच्या प्रॉपर्टीशी संबंधित नाही की, बंगल्यात वरच्या खालच्या मजल्यावर कोण राहणार नव्हे तर मराठी मतांचे डिव्हिजन होते. दोघेही पब्लिक फिगर आहात, महाराष्ट्राचे नुकसान होते, असा मुद्दा आहे, मग त्यांनी सुरू केले, मग ते खालच्या स्वरात आले.

मोदी मीडिया सेव्ही अन्त्यांचा अायक्यू
मोदी मीडिया सेव्ही. खूप मीडियाला काउंट करतात. हिंदी गुजराती पेपरचे रिपोर्ट पाहतात. ट्रान्स्लेट करून घेतात. पीआयबीला त्यांनी कामाला लावले आहे, त्यांच्याकडे विशेष सेक्शन आहे. ते स्वत:ला चहा विकणारा म्हणतात, त्यांचा अायक्यू त्याच लेव्हलचा आहे, हे त्यांच्या राजकीय धाटणीतून दिसते. गुजरातमध्ये ते तिसऱ्यांदा निवडून आले, यात विशेष काही नाही. फुलनदेवी निवडून आल्या. मध्य प्रदेशमध्ये हिजडा शबनम निवडून आला. मतांचे धुव्रीकरण करून लोक जिंकतात. निवडणूक जिंकणे हे विकासाचे पॅरामीटर्स होऊ शकत नाही. गुजरात द्वारका युगापासून संपन्न शहर म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात विकासाचे मॉडेल अशा अर्थाने तपासावे लागेल.

लोकशाहीवरून माणसाचा विश्वास उडाला तर नक्षलवाद फोफावेल. लोक शस्त्रे हातात घेतील. यासाठी पत्रकारिता हे दुधारी शस्त्र तोलून-मापून विचाराअंती हाताळायला हवे. प्रिंट-मीडियाच्या इतिहासात "भास्कर'ने "नो निगेटिव्ह मंडे' ही सुरू केलेली संकल्पना त्यादृष्टीने उचललेले एक मोठे पाऊल वाटते. आपल्याकडे एखाद्या "मीडिया हॉऊस'ने एक विषय हाताळला म्हणून, दुसरा कोणी हाताळत नाही हे वास्तव आहे. फ्री प्रेसला असताना मला २५० रुपये पगार होता. मी सुखी होतो. आता मी "एबीपी'मध्ये काम करतो. इंडिया अपग्रेट मॅगेझीनचा सल्लागार संपादक आहे. इतरत्र कॉलम लिहितो. दिल्लीतील पत्रकारितेने मला ग्लॅमर दिले. पण खरे समाधान इंदौरमध्ये काम करतानाच मिळत होते. ग्रामीण भागात, गावात पत्रकारिता आहे. सोलापुरात काय चालले आहे, बिहारच्या इलेक्शनवर आम्ही बोलतो, परंतु त्यासाठी लोकांकडून माहिती घेतो. जेवढे तुम्ही वर जाल तेवढे तेथे हास्यास्पद आहे.