आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावण्यात आश्विनी पारसे अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा क्रीडा महोत्सवात रंगलेल्या कबड्डी सामन्याचा एक रोमहर्षक क्षण. छाया : रामदास काटकर
सोलापूर- जिल्हाक्रीडा महोत्सवात धावण्याच्या शर्यतीत माळशिरसच्या अाश्विनी पारसे प्रथम आल्या. म्हाळुंग (माळशिरस) संघाने रस्खीखेच कबड्डी या दोन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावित दुहेरी मुकुट संपादिला.

येथील ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध बचत गटातील २५० महिलांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिपरे विभागीय संनियत्रण मूल्यांकन अधिकारी सिद्धाराम माशाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पारितोषिके पोलिस उपायुक्त आश्विनी सानप, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अशोक सावंत, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीनिवास पत्की यांच्या हस्ते देण्यात आली. कुंदन शिनगारे यांनी प्रास्ताविक केले. एस. बी. चिंचोलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तनुजा पाटील यांनी आभार मानले.

अंतिम निकाल (प्रथम तीन) वैयक्तिक : धावणे : आश्विनीमहावीर पारसे, विमल संतोष पाटील (माळशिरस), मीरा यल्लप्पा कसबे (मोहोळ), लिंबूचमचा : भाग्यश्रीमहेश लोखंडे (माळशिरस), माया हनुमंत काळे, मनीषा बंडू व्यवहारे (मोहोळ). संगीतखुर्ची : नीलमसोमनाथ बनसोडे (सायली, वेळापूर), सुनीता प्रमोद कांबळे(दुर्गामाता, धर्मपुरी-नातेपुते), रुक्मिणी गुंडू चव्हाण (जय सद्गुरू, अक्कलकोट ). संगीत खुर्ची (सहयोगिनी) : सुवर्णा राजेंद्र धाडवे (एमअारसी, अकलूज), वैशाली विठ्ठल बाळेकर (तडवळ), शारदा शिवाजी नाईकवाडी (नवज्योत).
सांघिक(प्रथम तीन) : रस्सीखेच : म्हाळुंग(माळशिरस), पापरी (मोहोळ), अकलूज (माळशिरस). कबड्डी : म्हाळुंग (माळशिरस), मोहोळ (सोलापूर), वेळापूर (माळशिरस ब).