आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील सर्वांत उंच युवक ठरला यशवंत राऊत, नुकताच जाहीर झाला एशियन रेकॉर्डस् हा किताब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपल्या उंचीने सोलापूरचा नावलौकिक वाढवणाऱ्या उंचकुमार यशवंत ब्रह्मदेव राऊत याला नुकताच एशियन रेकॉर्डस् हा किताब जाहीर झाला आहे. यामुळे त्याला सन्मानित करण्यात आलेल्या अनेक किताबात आता अजून एक मानाचा तुरा लागला आहे. यशवंतने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून त्याचे वय अवघे १४ वर्षे आहे. यापूर्वी त्यास दिल्लीच्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनचे वंडर बुक अॉफ रेकॉर्ड्स, पाँडेचरीचा असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड, हैदराबादचे हाय रेंज ऑफ बुक रेकॉर्ड्स, अमेरिकेचा गोल्डन बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड््स, कोलकाताचे युनिव्हर्सन रेकॉर्ड फोरम, लंडनचा मिरॅकल वर्ल्ड रेकॉर्डस्, हैदराबादचा गोल्डन स्टार ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस, २०१६ मध्ये यूआरएफ रेकॉर्ड अॅकॅडमीतर्फे सन्मान, वर्ल्ड टॉप टॅलेंट अॅवॉर्ड २०१५, कोलकाताचा युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्डस् आदी १२ संस्थांनी गौरविले आहे. वडील ब्रह्मदेव आई सुमन हे दोघेही शिक्षक असून त्याला एक बहीण त्रिवेणी आहे.
परीक्षादिली असून त्याचे वय अवघे १४ वर्षे आहे. यापूर्वी त्यास दिल्लीच्या वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनचे वंडर बुक अॉफ रेकॉर्ड्स, पाँडेचरीचा असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड, हैदराबादचे हाय रेंज ऑफ बुक रेकॉर्ड्स, अमेरिकेचा गोल्डन बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्स, कोलकाताचे युनिव्हर्सन रेकॉर्ड फोरम, लंडनचा मिरॅकल वर्ल्ड रेकॉर्डस्, हैदराबादचा गोल्डन स्टार ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस, २०१६ मध्ये यूआरएफ रेकॉर्ड अॅकॅडमीतर्फे सन्मान, वर्ल्ड टॉप टॅलेंट अॅवॉर्ड २०१५, कोलकाताचा युनिव्हर्सल वर्ल्ड रेकॉर्डस् आदी १२ जगत्मान्य संस्थांनी त्याच्या उंचीसाठी गौरविले आहे. वडील ब्रह्मदेव आई सुमन हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून त्याला एक बहीण त्रिवेणी आहे.

सन्मान असा : एशियन रेकॉर्ड्स हा किताब मिळाला आहे. १४ वर्षे वयोगटातील सर्वांत उंच मुलगा असा किताब आहे. आशिया खंडातील ५० देशांमधून सर्वांत उंच असा याचा उल्लेख करता येईल. हा किताब मिळवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश मिळवला. फेब्रुवारी २०१६ मध्ये यासाठी यशवंतने अर्ज केला होता. त्याला मार्चमध्ये उत्तर आले. फोटो आणि आधीच्या रेकॉर्डच्या प्रती त्यांना यासोबत जोडण्यात आल्या होत्या. यावरून ही निवड झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...