आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे अामिष दाखवून महिलेसोबत दुष्कर्म, चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बँकलोन मिळवून देण्याचे अामिष दाखवून एका चाळीसवर्षीय महिलेसोबत दुक्कर्म केल्याप्रकरणी दोघा तरुणांवर गुन्हा दाखल झाला अाहे. शीतपेयात गुंगीचे अौषध दिले. चित्रफीत तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत साडेपाच लाख रुपये घेतल्याची तक्रार महिलेने विजापूर नाका पोलिसात दिली अाहे.
 
दरम्यान, दोघा तरुणांना रविवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली अाहे. हा प्रकार १० जुलै २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत घडला अाहे. संतोष लक्ष्मण मंदोली (रा. हत्तुरे वस्ती, हल्ली - पुणे) त्याचा मित्र विजू स्वामी (रा. हत्तुरेवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. पीडित महिला संतोष याची हत्तुरेवस्ती भागात अोळख झाली होती. ती महिला बचत गट चालवत असल्यामुळे त्यांना संतोष याने बँक लोन मिळवून देण्याचे अामिष दाखवले. त्यांना घरी बोलावून घेऊन वरील अामीष दाखवले. गुंगीचे अौषध शीतपेयातून दिले, दुष्कर्म केेले. त्या शुद्धीवर अाल्यानंतर पैशाची मागणी करून चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. अनेकदा दुष्कर्म केल्याचे तक्रारीत म्हटले अाहे. तसेच मागील १६ महिन्यांपासून साडेपाच लाख रुपयेही मागून घेतले. ब्लॅकमेल करून दुष्कर्म केल्याची तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरवून स्वामी मंदोली या दोघांना रविवारी सायंकाळी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...