आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asset Purchase sale's Old Deal Document Get One Click

मालमत्ता खरेदी-विक्रीचे जुने दस्त मिळणार आता क्लिकवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जमीन,फ्लॅट वा दुकानांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त आता एका क्लिकवर पाहता येणार आहेत. नोंदणी मुद्रांक विभागाने सर्च प्रणालीद्वारे ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खरेदी-विक्री व्यवहार झालेल्या मिळकतीची १९८५ पासूनची सर्व माहिती या प्रणालीवर उपलब्ध करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९८५ ते २००१ या कालावधीतील लाख दस्त अपलोड करण्यात आले आहेत तर २००२ ते २०१२ या कालावधीतील अंदाजे १० लाख ३० हजार दस्त अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्कॅनिंग करून अपलोड केलेले सर्व दस्त नोंदणी मुद्रांक विभागाच्या www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

इंडेक्स डाउनलोड करता येणार यासुविधेच्या माध्यमातून अत्यावश्यक असलेली इंडेक्सची प्रतही आता डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्याची प्रमाणित प्रत पाहिजे असल्यास अल्प शुल्क आकारून ती प्रमाणित करून देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

६५ हजार दस्तमध्ये चुका : २००२ते २०१२ या कालावधीत जिल्ह्यातील १० लाख ३० हजार दस्तांचे स्कॅनिंग केलेे, यात ६५ हजार दस्तमध्ये चुका असल्याने त्या काढण्याचे काम सुरू आहे. दोन महिन्यात हे पूर्ण होणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एन. दुतोंडे म्हणाले.

१५ लाख दस्तांचे स्कॅनिंग
जुन्यादस्तांचे स्कॅनिंग करण्याची जबाबदारी आयजीआरकडे असून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व कार्यालयातील १५ लाखापेक्षा अधिक दस्तांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. स्कॅनिंग केलेले दस्त अपलोड करण्यात आले आहेत. उर्वरित काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश असून ते वेळेत पूर्ण करण्यात येईल. यानंतर सर्च प्रणालीवरून जुने दस्त पाहण्यास उपलब्ध होणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी दुतोंडे यांनी दिली.

हा होणार फायदा
जमीनफ्लॅटचा खरेदी व्यवहार करण्यापूर्वी संबंधितास त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल पाहणे आवश्यक ठरते. पूर्वी असे बदल पाहण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन शोध घ्यावा लागत. सामाईक कार्यक्षेत्रात एकापेक्षा अधिक कार्यालये असल्याने नागरिकांचा वेळही वाया जाते. याचा विचार करूनच सर्च प्रणालीद्वारे १९८५ पासूनचे दस्त उपलब्ध करून देण्यात येत आहेत.