आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहायक कुलसचिवांची चौकशी सुरू, कर्मचाऱ्यांना त्रास, नियुक्तीवरही आक्षेप, कुलसचिवांची डोळेझाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव अनिल जाधव यांची २००८ मध्ये झालेली नेमणूक चुकीच्या बिंदू नियमावलीनुसार झाली असल्याची तक्रार समोर अाली अाहे. मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष बबन जाेगदंड यांनी उच्च शिक्षण विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार होत आहे. कुलसचिवांनी याकडे डोळेझाक करू नये, अशी संघटनेची अपेक्षा अाहे.
सहायक कुलसचिव जाधव यांच्याकडे सध्या आस्थापना विभाग आहे. काही कर्मचाऱ्यांंनी कुलसचिव डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्याकडे जाधव यांच्या कार्यशैलीबद्दल लिखित तक्रार केली होती. मात्र काहीच परिणाम झाला नाही. दरम्यान उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांनी िवद्यापीठाकडे अनिल जाधव यांच्या संदर्भातील प्राप्त तक्रारींची चौकशी करून अहवाल पाठवावा, असा आदेश दिला आहे.

यापूर्वीही उचलबांगडी
अनिल जाधव हे यापूर्वी परीक्षा विभागात कार्यरत होते. विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रकरण समोर अाले. दरम्यान त्यांच्याकडे नॅक समिती कार्यालयाची जबाबदारी सुपूर्द केली. यानंतर आस्थापना विभागाचा कार्यभार सोपवला. तेथेही त्यांच्या कार्य शैलीबद्दल कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला.

^माझ्यावर जेआरोप करण्यात आलेले आहेत, त्यात काही तथ्य नाही, वस्तुस्थिती तशी नाही. अनिलजाधव, सहायक कुलसचिव
^अनिलजाधवयांच्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी प्राप्त आहेत. त्यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक अहवाल विद्यापीठाकडून मागवला अाहे. लवकरच अहवाल प्राप्त होईल. डॉ.सतीश देशपांडे, शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण
^अंतर्गतबाब कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, प्रशासनाच्या अंतर्गत बाबी आहेत. शिक्षण सहसंचालक कार्यालयास योग्य तो अहवाल दिला आहे. डॉ.देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव, विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...