आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात अखिल भारतीय ऊर्दू नाट्यसंमेलन डिसेंबरमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
सोलापूर- अखिल भारतीय ऊर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूरच्या वतीने डिसेंबर महिन्यात चार दिवस सोलापुरात अखिल भारतीय ऊर्दू नाट्यसंमेलन मुशायरा भरवण्यात येणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आतापासून करण्यात येत असल्याची माहिती समिती अध्यक्ष अॅड. यू. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, कोलकाता, बँगलोर, काश्मिरनंतर सोलापुरात हे संमेलन होणार आहे. यासाठी अांतरराष्ट्रीय पातळीवरील ऊर्दू नाटककार, लेखक, कवींना आमंत्रित करण्यात येणार आहे. चार दिवस संमेलन घेण्याचा मानस असून, त्यापैकी तीन दिवस अांतरराष्ट्रीय पातळीवरील ऊर्दू नाटके सादर करण्यात येतील. चौथ्या दिवशी बक्षीस वितरण, सत्कार होणार आहे. याशिवाय कविसंमेलन होणार आहे. शेवटी मुशायरा होणार आहे. ऊर्दू भाषिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक प्रश्नावर चिंतन मनन करण्यात येणार आहे. यासाठी शंभरपेक्षा अधिक ऊर्दू नाटककार, कवी, लेखक, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार शरद बनसोडे, महापौर सुशीला आबुटे, आमदार इतर लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे.
संमेलनाची तयारी आतापासून करण्यात येत असून, त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येत आहेत. वातावरण निर्मितीसाठी निबंध, वक्तृत्व, सुलेखन, चित्रकला, एकांकिका स्पर्धा, जिल्हास्तरीय कविसंमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनासाठी सर्वांनी सहयोग द्यावा, असे आवाहन समिती अध्यक्ष अॅड. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केले.
बातम्या आणखी आहेत...