आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अथर्व’ यंदा करणार मल्हारी गाण्याचा देखावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बाहुबली चित्रपटाचा भव्य देखावा उभा करून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेल्या दाजी पेठेतील अथर्व सांस्कृतिक गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मल्हारी मल्हारी तिडक तिडक’ या गीताचा भव्य सजीव देखावा करणार आहे. पेशवे बाजीराव यांच्या भूमिकेतील कलाकारासह ३० कलावंत देखाव्यात काम करणार आहेत.
८० बाय ८० सभामंडपात या देखाव्याची निर्मिती केली जाणार आहे. यावेळी मल्हारी मल्हारी तिडक तिडक या गीताच्या आधी बादशहा आणि बाजीराव यांच्यात झालेले संभाषण आविष्कार करून त्या नंतरचा नृत्याचा प्रसंग यावेळी उभारला जाणार आहे. यावेळी बाजीरावांनी केलेला गनिमी कावा याचा मजेशीर प्रसंग अत्यंत खुबीने उभा केला जाणार आहे.

देखाव्यात यांचा वाटा
संस्थापकव्यंकटेश कांेगारी, शेखर कांेगारी, अंबादास कामूर्ती, नागेश कोटेकल, अंबादास दोरनाल, राजू बिंगी, इरेश तट्टे, राजू लोमटे, गणेश दोरनाल, राजू इराबत्ती, नागेश कुस्मा, पुरुषोत्तम सग्गम, रामकृष्ण कोरे या सर्वानी मिळून ही संकल्पना पूर्णत्वास आणली आहे. सध्या सभामंडपाचे अाणि मंचाचे काम जवळपास होत आले आहे. या देखाव्यात संतोष कासे हे बाजीरावांच्या भूमिकेत असतील.

सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे
मंडपाची आणि मंचाची उभारणी सुरू झाली आहे. यंदा ३० स्वयंसवेक आणि सुरक्षा रक्षक असणार आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवणार आहे.

सोलापूरकरांसाठी धडपड
^देखावे पाहण्यासाठी पूर्वी लोक पुणे-मंुबईला जात. आता काळ बदलला आहे. कुठे काही करणे सोपे झाले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आम्ही केलेला बहुबलीचा देखावा. त्याने खूप आनंद मिळाला. यंदा बाजीराव मस्तानी चित्रपटातील मल्हारी मल्हारी या गीतावर अाधारित देखावा तयार केला आहे.” व्यंकटेश कोंगारी, अध्यक्ष, अथर्व सांस्कृतिक मंडळ
बातम्या आणखी आहेत...