आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ना सुरक्षारक्षक, ना सुरक्षित दारे ‘एटीएम’ केंद्रांत असुरक्षित वारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षकच नसल्याने गैरप्रकार वाढलेले आहेत. काही भागात तळीराम चक्क केंद्रात जाऊन शटर अर्ध्यावर आेढून निवांत झोपतात. काही ठिकाणी दारांच्या काचा फोडण्यात आल्या. पैसे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना, कोणीही आत घुसावे आणि हिसका मारून क्षणार्धात फरार व्हावा, अशी स्थिती निर्माण झाली. या महिन्यात दसरा, दिवाळी आहे. बँकांना सुट्या आहेत. त्यामुळे एटीएम केंद्रांवर ताण पडेल. अशा स्थितीत ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल.
विडी घरकुल येथे काचच फोडली
^हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलच्या सागर चौकात बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र अाहे. काही दिवसांपूर्वी रात्री अज्ञात इसमांनी त्याच्या दारावरील काच फोडून टाकली. त्याचे तुकडे आत विखुरले होते. त्याबाबत कुणीच दखल घेतली नाही. साधारण १५ दिवस असेच चित्र होते. केंद्रात पैसे भरण्यासाठी माणसं यायची. परंतु काचेचे काम आमचे नाही, असे म्हणायचे. कुणाकडे तक्रार करावी, हेदेखील सांगत नव्हते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चित्र दिसले नाही का? एवढी अनास्था असेल तर ग्राहकांची सुरक्षा कोण घेईल? विठ्ठल कोटा, नगरसेवक, घरकुल

मुरारजी पेठेत एटीएमची काचच काढली
^मुरारजी पेठेतील भागवत पेट्रोलपंपासमोर अॅक्सिस बँकेचे एटीएम केंद्र आहे. तिथे प्रवेश करण्याच्या दाराला काचच नाही. एक ग्राहक आत असल्याने मी बाहेर वाट पाहत होतो. आतील ग्राहक दार ढकलून नव्हे, तर थेट बाहेर पडला. मला आश्चर्य वाटले. पाहतो तर काय त्या दाराला काचच नाही. हा तर संवेदशनशील भाग. एसटी स्थानकाकडे जाणारे प्रवासी इथे पैसे काढत असतात. पण, त्यांची सुरक्षा पाहा...गेल्या अनेक दिवसांपासून अशीच स्थिती आहे. त्याकडे संबंधित बँकेचे दुर्लक्ष का? पैसे भरणारी यंत्रणा सांगत नाही? प्रा.बाळासाहेब भास्कर, सोलापूर
नियम काय आहेत?
Àप्रत्येक एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक आवश्यक
Àग्राहक आत गेल्यानंतर दारे पूर्णत: बंद असावीत
Àआतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात केंद्राचे चित्र येणार
Àग्राहक बाहेर पडताना, आतील बटण दाबून यावा

नेहकी स्थिती काय?
Àबँकांच्या शेजारी असलेल्या केंद्रांवरच सुरक्षारक्षक
Àदारे असुरक्षित, आत कोणीही सहज प्रवेश करतो
Àसीसीटीव्ही कॅमेऱ्यात आतलेच चित्र, बाहेरचे नाही
Àआत होणारी प्रक्रिया बाहेरच्या लोकांना सहज दिसते
अशोक कोटियन, मुख्यव्यवस्थापक आयटी सुरक्षा, बँक ऑफ इंडिया, सोलापूर
प्रश्न: सर्वच एटीएम केंद्रांवर सुरक्षारक्षक दिसत नाहीत? À तसेअपेक्षित नाही. कमीत कमी खर्चात ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी सुरक्षारक्षकविना एटीएम केंद्रे चालवण्याच्या सूचना आहेत.

प्रश्न: संवेदनशील भागात तरी आवश्यक वाटत नाहीत? À तशाकाही वाईट घटना घडल्या तर ग्राहक आमच्याकडे थेट तक्रार करू शकतो. केंद्रात संपर्काचा क्रमांक लिहिलेला असतो.
प्रश्न: प्रवेशाची दारेदेखील सुरक्षित नाहीत. त्याचे उपाय? À मला,वाटतं की यात नागरी सहभाग महत्त्वाचा आहे. ग्राहकांनी या अडचणी आमच्यापर्यंत मांडल्या तर निश्चित सुविधा मिळतील.
प्रश्न: काचा फोडतात, तळीराम जाऊन झोपतात? À बँकांच्यासंबंधित शाखा एटीएम केंद्रांवर लक्ष ठेवून असतात. या घटना त्यांच्या नजरेस आल्या तर निश्चित कारवाई होईल.
एसटी, रेल्वेस्थानक अशा ठिकाणी एटीएम केंद्रे पुरेशी आहेत. तिथे २४ तास ग्राहक असतात. प्रवासी रात्री, मध्यरात्रीही पैसे काढत असतात. परंतु तिथेही सुरक्षारक्षक नाहीत. हातात बॅगा आणि लहान मूल असताना, कुठला वाईट प्रसंग आला तर हा ग्राहक करणार काय? कुठंवर पळणार? सुरक्षा देण्याची जबाबदारी कुणाची? महिला ग्राहक असतील तर आणखी अघटितही घडू शकते. असे प्रकार काही राज्यात घडलेही. त्याचे व्हीडीआे क्लीप सोशल मीडियावर वायरल झाले. वाहिन्यांवर दाखवले गेले. ते सोलापुरातही घडण्याची वाट पाहू नये, अशी माफक अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...