आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूममध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला, जिल्हाभरात पत्रकार संघांकडून हल्ल्याचा निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम/ उस्मानाबाद - भूम येथील पत्रकार शब्बीर कादर सापवाले यांच्यावर सोमवारी (दि. ४) रात्री च्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला. याचा जिल्हाभरातील पत्रकारांनी निषेध करून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.

 

सापवाले सोमवारी रात्री च्या सुमारास महावीर मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी गेले होते. या वेळी गजानन चंद्रकांत बाराते याने सापवाले यांना शिवीगाळ केली. जाब विचारल्यावर आरोपीने मारहाण केली. खिशातून रेडियम कटर काढून पोटात मारला. यावेळी सापवाले यांचा हात आडवा आल्याने त्यांच्या अंगठ्याला जखम झाली.

 

जिल्हाभरातून निषेध : याहल्ल्याचा जिल्हातील पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे. कारवाईच्या मागणीसाठी पोलिस अधीक्षक, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. उस्मानाबादेत पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना पत्रकार रवींद्र केसकर, हुंकार बनसोडे, विठ्ठल पाटील, चंद्रसेन देशमुख, राजा वैद्य, संतोष जाधव, मोतीचंद बेदमुथा, संतोष हंबीरे, अमरसिंह भातलवंडे, बाबुराव चव्हाण, सयाजी शेळके, आकाश नरोटे, प्रवीण पवार, मल्लिकार्जुन सोनवणे उपस्थित होते.

 

उमरगा, परंडा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. उमरगा येथे अविनाश काळे, सुभाष जेवळे, अंबादास जाधव, शंकर बिराजदार, जाफर जमादार, मारुती कदम, समीर सुतके, बालाजी वडजे, आदिनाथ भालेराव आदींनी निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...