आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमअायएम-‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते साेलापुरात भिडले, माजी उपमहापौर सय्यद, माजी नगरसेवक शेख यांच्या गटात हाणामारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक २१ मध्ये रविवारी पदयात्रेने निघालेले एमअायएम अाणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अामने-सामने अाल्यानंतर किरकोळ वादातून त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.  यात चौघे जखमी झाले असून १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले अाहे.  
 
एमअायएम पक्षाचे शहराध्यक्ष तथा उमेदवार ताैफिक शेख, राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक माजी उपमहापौर हारुण सय्यद यांच्या रविवारी स्वतंत्र पदयात्रा निघाल्या हाेत्या. दुपारी बाराच्या सुमारास नई जिंदगी परिसरातील अमन चाैकात हे दाेन्ही गट समाेरासमाेर अाले व त्यांच्यात वाद भडकला.
 
 दाेन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले, झेंड्याच्या काठ्यांनी हाणामारी झाली. सय्यद यांच्या भावाच्या घरावर दगडफेक करून साहित्याची मोडतोड केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. परिसरातील दुकाने बंद झाली.
 
राज्य राखीव दलाचे जवान, कमांडो फोर्सचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात अाला. सय्यद व शेख या दोन्ही गटांनी एमअायडीसी पोलिस ठाण्यात परस्परविराेधात तक्रार दिली अाहे. या हाणामारीत सय्यद यांच्यासह चौघे जखमी असून दोन्ही गटांतील सतरा जणांना ताब्यात घेतले अाहे.    
 
नगरसेवक सय्यद यांच्या तक्रारीवरून तौफिक शेख, सादिक अब्दुल पटेल, अमीन नेरकरी, जावेद कल्याणी, अल्ताफ बेलीफ, निसार अ. शेख, अासिफ फरिद शेख, इम्रान करीम शेख यांच्यासह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल अाहे. अारिफ फरीद शेख (४५, रा. सिद्धेश्वरनगर, भाग दोन, मजरेवाडी) यांच्या तक्रारीवरून हारुण सय्यद, वाहब सय्यद, कासीम सय्यद, मोहंमद हनीफ सय्यद, हनीफ सय्यद, वसीम सय्यद, अल्ताफ बोरोटी अादींवर गुन्हा दाखल झाला अाहे. 
 
रुग्णालयातही हाणामारी  
दाेन्ही गटांतील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात अाले. तिथेही दाेन्ही गटांचे कार्यकर्ते माेठ्या संख्येेने हाेते. त्यामुळे तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर हारुण सय्यद हे रुग्णालयात गेले तेव्हा विराेधी गटातील कार्यकर्त्यांनी तिथे त्यांना मारहाण केल्याची माहिती अाहे. मागील महापालिका निवडणुकीत हारुण सय्यद व तौफिक शेख अामने-सामने होते. त्यात सय्यद विजयी झाले. यंदाही दोघांमध्येच लढत हाेत अाहे.     
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...