आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशील भागात राहणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष, उमेदवारांशी पोलिस अायुक्त साधणार संवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-  महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षातील उमेदवार करीत अाहेत. पोलिस प्रशासनही मतदान शांततेत होण्यासाठी उपाययोजना करीत अाहे. शहरातील महत्त्वाच्या (संवेदनशील) ५०-६० चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार अाहेत. त्याचे चित्रण थेट पोलिस अायुक्तालयातील नियंत्रण कक्षात दिसणार अाहे. तसेच येत्या बुधवारी पोलिस अायुक्त सर्वच पक्षातील उमेदवारांशी संवाद साधणार अाहेत. पोलिस पदाधिकारी यांच्यात समन्वय राहावा हा उद्देश असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी दिली. 

शहरातील संवेदनशील बूथची यादी तयार झाली असून सोमवारी या बूथची पाहणी पोलिसांकडून सुरू झाली. जेणेकरून चांगला सक्षम बंदोबस्त लावण्यासाठी मदत होईल. 

काॅर्नर सभा, बैठका, रॅली, जाहीर सभा घेण्यासाठी पोलिस अायुक्तालयातील एक खिडकी येथून परवानगी घेणे बंधनकारक अाहे. शिवाय महापालिका प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक अाहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक अायोगाने नऊ सहायक निवडणूक अधिकारी नेमले असून त्यांच्या पथकाकडून यावर लक्ष ठेवण्यात येणार अाहे. सातही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठा बंदोबस्त राहील. प्रत्येक पोलिस ठाण्याला एक सहायक अायुक्त दर्जाचा अधिकारी प्रमुख राहील. तर तीन पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील असे सांगण्यात अाले. 

महत्त्वाचे मुद्दे.... 
{८७ जणांना तडीपार करण्यात अाले अाहे 
{३४ जणांना अाणखी तडीपार करण्यात येणार असून, १६ जणांची प्राथमिक चौकशी सुरू अाहे 
{सोशल मीडियावर राहील विशेष लक्ष 
{अाठ ठिकाणी दररोज नाकाबंदी 
{२४ ठिकाणी विशिष्ट वेळेत नाकाबंदी 
{रॅली, सभा वेळी वाहतूक अडचण होणार नाही याबबात खास िनयोजन 
बातम्या आणखी आहेत...