आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीपेड रिक्षा भाडे १८१ ठिकाणचे ठरले, लवकरच होणार अंमलबजावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रवाशांना सुरक्षितपणे निश्चित दरामध्ये सेवा उपलबध देण्यासाठी तसेच शहरातील प्रमुख मार्गावर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे, फसवणूक होणे याला आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रीपेड रिक्षा सुरू करण्याच्या प्रस्तावास प्रादेशिक परिवहन विभागाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यावेळी सोलापुरातील जवळपास १८१ ठिकाणचे दर निश्चित करण्यात आले. सोलापूर बसस्थानक सोलापूर रेल्वे स्थानक या दोन ठिकाणांहून प्रीपेड रिक्षा सेवेचा लवकरच शुभारंभ होणार आहे.
जिल्हा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे, गजानन नेरपगार, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, कार्यकारी अभियंता विलास मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते. प्रीपेड रिक्षा ही फायद्यासाठी आहे. या सेवेमुळे प्रवासी ॲटोरिक्षा यांच्यामध्ये समन्वय निर्माण होईल. रेल्वे स्थानकावरील शिस्त वाढण्यास मदत होईल. प्रीपेडचे दर आकारणी करताना सोलापूर आरटीओने मुुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आदी शहरांच्या रिक्षा भाड्याचा अभ्यास केला आहे. सोलापूर बसस्थानकावरून खालील ठिकाणे प्रीपेड रिक्षाचे भाडे असणार आहे. यात पाच रुपये बूथचालकांना द्यावे लागणार आहेत. हे पाच रुपये प्रवाशांना द्यावे लागतील.

विडी घरकुल ७७
सात रस्ता २४
गांधी नगर चौक ३३
महावीर चौक ३७
अासरा चौक ५५
किनारा हॉटेल ४७
मजरेवाडी ७१
िवमानतळ ८१
मार्केट यार्ड ६५
बोरामणी नाका ५९
जुना विजापूर नाका ४३
भारती विद्यापीठ ५५
इंचगिरी मठ ५९
सैफुल ७२
डी मार्ट ७७
जुळे सोलापूर ७९
भय्या चौक १८
मेकॅनिकी चौक २४
शिवाजी चौक २८
जुना पुना नाका ३९
बाळे ७६
महापौर बंगला १८
डफरीन चौक १८
रंगभवन २५
पोटफाडी २३
जोडबसवणा चौक ४७
शांती चौक ४९
जुना अक्कलकोट नाका ५९
गांधी नगर ६५
गांेधळे वस्ती ६७
रंगराज नगर ७१
भय्या चौक २८
रेल्वे स्थानक ३५
कुमार चौक ४०
मोदी पोलिस चौकी ४७
पार्क चौक २२
भारती विद्यापीठ ७९
इंचगिरी महाराज मठ ८७
सैफुल १०१
एसआरपी कॅम्प १२१
सोरेगाव १३५
जुना पुना नाका १८
बाळे ४३ गुरुनानक चौक ५५
कुमठा नाका ६५
नई जिंदगी ८२
सरस्वती चौक १८
डफरीन चौक २५
सात रस्ता ४१
पत्रकार भवन चौक ४९
जुना विजापूर नाका ५९
अशोक नगर क्रॉस रोड ६९
अारटीओ कार्यालय ७८
रंगभवन चौक २४
सिव्हिल चौक २९
पाेटफाडी चौक ३१
आम्रपाली चौक,
अशोक चौक ५७
संत तुकाराम चौक ६१
गेंट्याल चौक ६४
७० फूट रोड : मंडई ६६

^लवकरच प्रीपेडरिक्षा सेवा सुरू करणार आहोत. यासाठी आरटीओने दर ठरवले आहेत. प्रीपेड बूथवरून प्रवाशांना हेच दर रिक्षाचालकांना द्यावे लागतील. नागरिकांच्या माहितीसाठी लवकरच दरपत्रक सार्वजनिक ठिकाणांवर प्रसिद्ध करण्यात येतील.'' बजरंग खरमाटे, उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी, सोलापूर

किमीसाठी ७३ रुपये दर
बसस्थानक ते आरटीओ कार्यालय या किलोमिटर अंतरासाठी सध्या मीटरप्रमाणे ६१ रुपये भाडे आकारले जाते. मात्र शेअर रिक्षा प्रकारात ६१ रूपये अधिक २० टक्के असे एकूण ७३ रूपये भाडे प्रवाशांसाठी लागु होईल. एका प्रवाशाला १/३ प्रमाणे २४ रूपये भाडे आकारणी होईल. इच्छित ठिकाणी जाणारे मार्ग दर्शविणारे बोर्ड लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिल्या.
बातम्या आणखी आहेत...