आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Available Sources Can Overcome Water Scarcity In Solapur

उपलब्ध स्रोतांनी टळू शकेल टंचाई, प्रक्रियेव्दारे करता येईल पिण्यायोग्य जलसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर; शहरावरसध्या जलसंकट उभे ठाकले असून उसणवारीच्या पाण्यावर दिवस काढण्यापेक्षा शहरातील उपलब्ध जलस्रोतांतून काही प्रमाणात पाणी देता येईल असे निदर्शनाला आले आहे. शहरातील तज्ज्ञांचा महापालिका अधिकाऱ्यांचा यास होकार आहे. यात शहरातील काही पिण्यायोग्य पाण्याच्या विहिरी तलावांचा समावेश आहे.

यंदाचे अत्यल्प पर्जन्यमान, चुकीचे नियोजन, जलवाहिनीला होणाऱ्या गळत्या पाणीचोरी अशा परिस्थितीतून शहराला पाणीपुरवठा होतो. वर्षाची पाणीपट्टी भरूनही ३६५ दिवस पाणीपुरवठा करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. पण उपलब्ध जलस्रोतांचा वापर केला तर दिवसाकाठी लाखो लिटर पाणी पिण्यास वापरण्यास उपलब्ध होऊ शकते.

परिसरातीलखाणींचाही करता येईल उपयोग
शहरापासूनअगदी जवळ तुळजापूर रस्त्यावर अनेक दगड खाणी आहेत. यात प्रतिवर्षी पावसाळ्यात बरेच पाणी साठते. या खाणींची खोली पाहता यात उपलब्ध पाण्यावर शुद्धीकरण केले तर हे पाणी किमान वापरण्यास येते. यातून वर्षाकाठी लाखो लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते.

सर्वशहरवासियांवर जलपुर्नभरण करावे सक्तीचे
उपलब्धपाण्याचा उपयोग पिण्यास, जनावरांकरता, शेतीस, कारखानदारीकरता करून विकास साधणे आवश्यक आहे. जलसंधारणाच्या योग्य पद्धतीद्वारे पाणी साठवून जमिनीत मुरल्यास पाणीपुरवठ्याकरता वापर करता येईल. वार्षिक पाऊसमान मिलिमीटर x क्षेत्र चौरस मीटर = लिटर पाणी प्रति वर्षी असा हिशोब करून ते करावे लागते. उदा. २०० चौरस मीटर छपरावरून वाहणारे पाणी x १००० मिलिमीटर सरासरी पाऊसमान = २२ किलो लिटर प्रति वर्षी पाणी साठवणे शक्य होईल. तसेच पावसाचे पाणी भूगर्भात साठवून भूगर्भाची पाणीपातळी वाढवली जाते.
सुजाण नागरिक रमेश जहागिरदार

यांनी सूचवले काही उपाय
सध्याहोटगीतलावाचा वापर होत नाही. त्यातील पाणी जवळच्या बंधाऱ्यातून ओसंडून वाहले. पण ते आणायची व्यवस्था असती तर पाणी येथे साठवले असते.

हिप्परगातलावातीलपाणी मंगळवार पेठ, मधला मारुती किंवा गावठाण भागात व्यवस्थित मिळते. होटगी तलावाचा वापर जुळे सोलापूर, विमानतळ, होटगी आदी भागांकरता करण्यात येईल.

अनेकवेळेसटाकी भरून पाणी वाया जाते, ते रोखावे. सध्या होटगी तलाव ते सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापर्यंत जलवाहिनी आहे. तलावापासून जवळील परिसरात मोठी वाहिनी टाकण्यापेक्षा छोटी वाहिनी टाकता येते.

संभाजीसिद्धेश्वरतलावांतील गाळ काढावा. शहराच्या चारही बाजूला पाण्याच्या निचऱ्याची सोय आहे. काही वर्षांपूर्वी भाजपचे बंडोपंत कुलकर्णी नगरसेवक असताना शहराच्या जलसाठ्यांचा सॅटेलाइट सर्वे करण्याकरता १० लाखांची तरतूद केली होती.

शहरातअसलेल्यानैसर्गिक खड्ड्यांचा वापर करता येतो. वसंत नगर, विजापूर रोड, तुळजापूर रोड आदी भागात मोठे खड्डे तुळजापूर रोडवर रिकाम्या खाणी आहेत. तेथे जलपुर्नभरण जलसंकलन करता येते.

पालिकेतीलनिवृत्तअधिकारी चावीवाले कर्मचाऱ्यांना तोट्या, वॉल्व्हची माहिती आहे. त्यांचा वापर करून घ्यावा, जेणेकरून भविष्यात पाणीपुरवठ्यात सुलभता येईल. मोठ्या शहरात शुुद्धीकरण प्रणाली आहे. त्याचा अवलंब करावा. स्मार्ट शहरासाठी स्मार्ट अधिकारी हवेत.
साखर पेठ विहिरीवर जलशुद्धीकरण संयंत्र बसवण्यात आलेले आहे. छाया: दिव्य मराठी
विहिरींमुळे फरक पडेल
^शहरातील१३विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे. याव्दारे शहरवासियांना दिवसाकाठी किमान एक ‘एमएलडी’ पाणी आपण उपलब्ध करू शकतो. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटेल.” आर. एन. रेड्डी, उपअिभयंता,पाणीपुरवठा विभाग, महापालिका

साखर पेठ विहिरीतूून सुमारे १०० आउटलेट दिलेत
साखरपेठेतीलविहीर मोठी आहे. त्यात पाणीसाठा चांगला असून पाणी पिण्यायोग्य आहे. यातून परिसरातील विविध भागात सुमारे १०० नळजोड दिलेले आहेत. सध्या यावर उपशासाठी एक अश्वशक्तीचे पंप बसवले आहे. पाच अश्वशक्तीच्या पंपाची महापालिकेकडे मागणी केली आहे.” उदयशंकर चाकोते, नगरसेवक

हे आहेत उपाय
जगभरातील सद्यःस्थिती
चीन, ब्राझीलमध्ये छतावरील वाहून जाणारे पाणी साठवून वापरण्यात येतेे. या पाण्यावर जनावरांचे संगोपन होते. बरमुडा, बीजिंग, मेक्सिकोत घरात पाणी साठवण्याची सोय करण्यास कायदा आहे. युरोपमध्ये प्रत्येक बागेत पाणी साठवण्याची व्यवस्था असून त्यातून बागेतील झाडे संगोपन होते. ब्रिटिश शासनाने पावसाचे पाणी टाकीत साठवून स्वच्छतेसाठी वापरण्याचे नियोजन केले असून यातून ५० टक्के पाण्याची गरज भागवण्यात येतेे. म्यानमारमध्ये भूगर्भातील पाणी खारट असल्याने पावसाचे पाणी साठवण्यावर भर आहे.

पावसाचे पाणी हवेतील, छतांवरील धुळीमुळे दूषित होते, त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य ठरतेच असे नाही. अशा पाण्यात जंतूंचे प्रमाण अधिक असते. अशा पाण्यात चुना, मॅग्नेशिअम, सोडिअम, पोटॅश, क्लोरिन, सल्फेट यांचे तसेच कार्बन-डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड याचे प्रमाण अधिक असते. अशा पाण्यात क्लोरिन मिसळून ते जंतूरहित करून वापरले जाते. त्यामुळे सोलर कुकरद्वारे स्वस्तात पाणी शुद्ध करण्याची सोय आहे.
पाणीपुरवठा आकडेवारीत
१३ विहिरीतील पाणी पिण्यायोग्य
१३४ शहरात एकूण विहिरी
१५ एमएलडी एमआयडीसी पाणीपुरवठा
१३० एमएलडी उजनी आणि औज येथील उपसा
७८ एमएलडी प्रत्यक्ष उपलब्ध पाणीपुरवठा
महापालिकेच्या मालकीच्या आठ विहिरी
विडीघरकुल, सुभाष उद्यान (जेलरोड), साखर पेठ शॉपिंग सेंटर, दमाणी नगर उद्यान, रेवणसिद्धेश्वर विहीर, रूपाभवानी मंदिर उद्यान, देगाव, जयभवानी बाग (घोंगडे वस्ती).
खासगी मालकीच्या पाच विहिरी
लक्ष्मीविष्णूचाळ, फाॅरेस्ट (मौलाली बावडी), पारशी आग्यारी (लष्कर), चंडक बगिचा (बुधवार पेठ), धोत्रीकर वस्ती

पुढील स्‍लाइडवर वाचा भारतातील स्थिती