आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया करता टाळा हृदयरोग, निसर्गोपचार पद्धती वापरा : छाजेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित हृदयविकारावरील व्याख्यानाच्या उद्घाटनावेळी पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे, ब्रॅडिंग प्रमुख अदनान कनोरवाला, प्रमोद जोशी.
सोलापूर - देशात एक कोटी हृदयरोगाचे रुग्ण आहेत. त्यापैकी वर्षाकाठी सुामरे ५० लाख लोकांचा मृत्यू होतो. यांना वाचवता येऊ शकते, असे मत डॉ. बिमल छाजेड यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
रक्तपुरवठा करणाऱ्या दोन रक्तवाहिन्या असतात. परंतु त्यापैकी एकच चालू असते एक बंद अवस्थेत जाते. बंद रक्तवाहिनी नॅचरल थेरपीद्वारे सुरू करता येते. हा प्रयोग मुंबई दिल्लीसारख्या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही शस्त्रक्रिया करता हृदयरोग अथवा बायपास करण्याचे टाळल्याने रुग्णाचा प्राण वाचू शकताे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ‘दिव्य मराठी’ दैनिक भास्कर नॉलेज सिरीजअंतर्गत ‘जाणून घ्या निरोगी हृदयाची स्पंदने’ याविषयावर व्याख्यान झाले. मंचावर पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक संजीव पिंपरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश कोठे, ब्रॅडिंग प्रमुख अदनान कनोरवाला, प्रमोद जोशी उपस्थित होते.

डॉ. छाजेड म्हणाले की, हृदयरोगाचे रुग्ण वरचेवर वाढत आहेत. परंतु हृदयरोग लगेच होता. वयोमर्यादेनुसार वाढत जातो. प्रत्यक्षात १८ वर्षांनंतर जडायला म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढायला सुरुवात होते. आहारातील तेल इतर फॅटयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात आल्याने कोलेस्ट्राॅल वाढते. कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. तसेच बऱ्याचवेळा रक्तवाहिन्या फुटल्या जातात. त्यामुळे रुग्ण दगावतो. यासाठी जेवणामध्ये तेल फॅटयुक्त पदार्थ खाण्याचे टाळणे महत्त्वपूर्ण आहे. याप्रसंगी डॉ. छाजेड यांनी जीवनशैली, आहार, शस्त्रक्रिया उपचार पद्धती, डॉक्टरांची मन:स्थिती यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमासाठी हॉटेल त्रिपुरसुंदरी सोलापूर हेल्पलाइनने सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन हेमंत पवार यांनी केले.
या गोष्टी टाळा
अनेक जण जास्तीचे तेल असलेले पदार्थ खातात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते. जास्त तेल खावू नका. तसेच मांस, मासे यामुळेही कोलेस्ट्रॉल वाढते, तंबाखू खाणे, दारू पिणे, धूम्रपान यामुळे ब्लॉकेज वाढण्याचे प्रमाण जास्त असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताण-तणावापासून दूर राहा. त्यामुळे देखील हृदयरोग कमी होण्यास मदत होते.
बातम्या आणखी आहेत...