आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द्वादशीवार यांना रंगण्णा तर अविनाश कुलकर्णींना जक्कल पुरस्कार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर झाले. रंगाअण्णा वैद्य स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांना तर पत्रमहर्षी बाबूराव जक्कल जिल्हास्तरीय पुरस्कार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. १६ जुलैला सकाळी साडेदहा वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात वितरण सोहळा होईल.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्या हस्ते अाणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असल्याची माहिती संघाने दिली. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी २५ हजार तर जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी १५ हजार रुपयांची रक्कम आहे. शिवाय स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
आमदार सुभाष देशमुख आणि प्रणिती शिंदे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस विजय देशपांडे यांनी केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...