आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठास अमेरिकेच्या इंडस फाउंंडेशनचा पुरस्कार प्रदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अमेरिका भारतात उच्च शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य करणाऱ्या अमेरिकेतील इंडस फाउंडेशनतर्फे सोलापूर विद्यापीठाला तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट उपयोग केल्याबद्दल एज्युकेशन टेक्नॉलॉजीचा पुरस्कार देण्यात आला. परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील यांनी तो स्वीकारला.
विद्यापीठाने गेल्या दोन वर्षांपासून केलेले अभिनव प्रयोग, परीक्षा विभागातील कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करून अंगीकारलेल्या विविध योजना, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राबविलेल्या विविध तंत्रज्ञानावर आधारित योजना, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन दीक्षांत समारंभापर्यंतचे शैक्षणिक कामकाज, पदवी प्रमाणपत्राच्या स्वरूपात तंत्रज्ञानाचा वापर करून क्युआर क्युसीची छपाई, सुरक्षाविषयक बदल केले आहेत. मोबाइल अॅप विकसित केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीसाठी कार्यान्वित केलेले व्हाॅट््सअॅप सुविधा, परीक्षाविषयक कामकाजात ऑनलाइन प्रश्नपत्रिका, ऑनलाइन परीक्षा, ऑनलाइन तपासणी आदी कामकाज सुरू केले, याची दखल घेतली. विद्यापीठाला गौरवत असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
भारतातील विद्यापीठे शैक्षणिक संस्था यांच्यासह अमेरिकेतील शिक्षण संस्थातज्ज्ञांचे इंडो अमेरिकन एज्युकेशन समिट नुकतेच मुंबईत झाले. यावेळी माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यंाच्या हस्ते विद्यापीठास पुरस्कार प्रदान झाला.

विद्यापीठाला फायदा
^सोलापूर विद्यापीठासहा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाचा जागतिक स्तरावर नावलौकिक प्राप्त झाला. याचा फायदा सोलापूर विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणार आहे. विद्यापीठाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे.” डॉ.एन. एन. मालदार, कुलगुरू
बातम्या आणखी आहेत...