आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक- पत्रकारांमुळे जागरुक समाज घडतो, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिक्षक संघाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षकांमुळे देश घडतो अन् पत्रकारांच्या अविश्रांत मेहनतीमुळे समाजिक सुधारणा होतात. जागरुक समाज व्यवस्थेतील प्रमुख घटक असलेल्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्याचा चांगला उपक्रम शिक्षक संघातर्फे घेण्यात आला, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले. 

पत्रकार दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण शनिवारी (दि. ७) पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. शिक्षण समितीचे सभापती मकरंद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात पुरस्कारांचे वितरण झाले. ‘दिव्य मराठी’चे बातमीदार विनोद कामतकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी राज्य शिक्षक संघाचे नेते बाळासाहेब काळे, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठलराव काळे, महादेव जठार, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद भरले गुरुजी, संघाचे कार्याध्यक्ष लिंबराज जाधव, संघाचे सरचिटणीस संभाजी फुले, वीरभद्र यादवाड, हरिभाऊ खरात, दादाराजे देशमुख, रावसाहेब जाधवर, उत्तम जमदाडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

शिक्षण सभापती निंबाळकर म्हणाले, "शिक्षकांच्या प्राधान्याने समस्या सोडवल्यामुळे मोर्चे, आंदोलनाचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी झालो. पत्रकारांनी नेहमीच आमच्या चुका दैनिकात प्रसिद्ध करून आम्हाचा सुधारण्याची संधी उपलब्ध करून दिली.' शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी प्रास्ताविकात कार्याची माहिती दिली. संभाजी फुले यांनी आभार मानले. 

यांचा झाला सन्मान 
विनोद कामतकर (दिव्य मराठी), संगमेश जेऊरे (तरुण भारत), संतोष आचलारे (पुढारी), हरिभाऊ कदम (संचार), अरूण बारसकर (लोकमत), प्रशांत माने (सुराज्य), शरिफ सय्यद (पुण्यनगरी) 
बातम्या आणखी आहेत...