सोलापूर - अासराचौकातील मंगल काॅम्प्लेक्समधील गाळा नंबर अाठ येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरला बुधवारी दुपारी एकला अाग लागली. शाॅर्टसर्किटमुळे अाग लागल्याची प्राथमिक माहिती समोर अाली अाहे. बँकेत नोटा बंदीपासून पैसे भरले नसल्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, सेंटरचे फर्निचर, मशिन अन्य संगणक साहित्य जळून खाक झाल्याची तक्रार बँकेचे अधिकारी संजय शिंदे यांनी विजापूर नाका पोलिसात दिली अाहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा करून अाग अाटोक्यात अाणली.
शटर अर्धवट उघडल्यामुळे बाहेर धूर येत होता. नागरिकांनी पोलिस अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर पथक अाले. एटीएम सेंटरमध्ये पैसे भरलेले नसले तरी फर्निचर मशिन साहित्य असे पाच लाखांचे नुकसान झाले अाहे.