आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांची मुद्रा असलेली नाणी अाज देणार भेट, पोलिसांचे रुटमार्च अन भीमजल्लोषासाठी मंडळांची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डाॅ.बाबासाहेब अांबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणूक रविवारी अाहे. सुमारे ७० मंडळे यात सहभागी होतील. ३७० मंडळांनी उत्सव साजरा केला अाहे. भीष जल्लोषासाठी विविध मंडळे, तरुणाई सज्ज झाली असून, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणाही सतर्क झाली अाहे. यंदा सेक्टर पद्धतीने बंदोबस्त लावला अाहे.
तीन उपायुक्त दोन सहायक अायुक्त यांच्या प्रमुख नियंत्रणाखाली टप्पा पद्धतीने वीस-वीस कर्मचारी, अधिकारी बंदोबस्त देतील. हे पथक कायम पायी पेट्रोलिंग करणार अाहे. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, अपर्णा गीते, अश्विनी सानप, सहायक अायुक्त महिपती इंदलकर, शर्मिष्ठा घारगे हे अधिकारी बंदोबस्त प्रमुख अाहेत. पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर अायुक्तालयात थांबून सर्व घटनांवर नियंत्रण ठेवतील. तेरा चौकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात अाली अाहे. त्याचे माॅनेटरिंग त्यांच्या दालनात अाहे. बसल्याठिकाणी संपूर्ण मिरवणूक मार्गावरील माहिती मिळणार अाहे.

सेक्टर बंदोबस्त म्हणजे नेमके काय ?
डाॅ.अांबेडकर पुतळा ते चांदणी चौक ते महापाैर बंगला. रेल्वे स्टेशन ते शिवाजी चौक. मेकॅनिकी चौक ते माणिक चौक, सम्राट चौक ते शिवाजी चौक, माणिक चौक ते मधला मारुती चौकातून पुढे असे बंदोबस्ताचे टप्पे अाहेत. त्याठिकाणी उपायुक्त, सहायक असा अाहे बंदोबस्त.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती देशभरात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी होत आहे. सोलापुरात अाज मिरवणुकीने त्याचा समारोप होत अाहे. सोलापूर उत्सव हे समीकरण जणू राज्यात अादर्शवत अाहे. आज मिरवणुकीच्या सुरुवातीस बाबासाहेबांची मुद्रा असलेली १० रुपयांची हजार नाणी (किंमत दहा हजार) सामाजिक कार्यकर्ते पी. आर बनसोडे नागरिकांना वाटणार आहेत. भारतीय रिर्झव्ह बँकेने बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १० रुपयांची नाणी चलनात अाणली आहेत. ती नाणी विशेष प्रयत्न करून बनसोडे यांनी मिळवली. यापूर्वी सरकारने बाबासाहेबांच्या शताब्दी वर्षानिमित्त एक रुपयांची नाणी काढली होती. परंतु ती लोकापर्यंत पोहचली नव्हती. ही नाणी लोकांच्या संग्रहात राहावीत, याकरिता हा उपक्रम असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दहा दिवस चाललेल्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी मिरवणुकीने होणार आहे. यंदा १२५ वी जयंती असल्याने सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाने जय्यत तयारी केली आहे. उद्या निघणाऱ्या मिरवणुकीत आकर्षक देखाव्यांसह भीम संदेश देण्यावर भर असणार आहे. दुपारी १२ वाजता सुरू होणारी मिरवणूक रात्री १२ पर्यंत चालणार आहे. याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

सोलापुरात होणाऱ्या जयंती सोहळ्याचा महाराष्ट्रात डंका आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी येतात. शहरातील भीमप्रेमी जनता मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभागी होते. याकरिता मिरवणुकीत लक्ष वेधून घेण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. आकर्षक देखाव्यांव्दारे बाबासाहेबांनी दिलेला संदेश सर्वसामान्यांपर्यंत पाेहोवण्यासाठी स्पर्धा असते.

देखाव्यांवर भर
प्रबुद्धभारत मंडळाच्या वतीने यंदा समता रथावर गौतम बुद्धांची मूर्ती, दिल्लीच्या इंडिया गेटची प्रतिकृती तसेच भारताचा मानबिंदू अशोक स्तंभ आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची मूर्ती असणार. शिवाय डॉ. बाबासाहेबांची ३२ फुटांची फायबरची मूर्ती त्यामागे तिरंगा ध्वजाची प्रतिकृती असणार आहे. बॉबी संस्थेच्या वतीने जपानमधील देखावा सादर करण्यात येणार आहे.

मदतीसाठी संपर्क
डाॅ.अांबेडक रजयंती उत्सवाची अाज सांगता होत अाहे. सर्वांनी उत्साहात यात सहभागी व्हावे. कायदा पाळावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. मदत पाहिजे असल्यास पोलिसांना संपर्क करा. कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसिंग राहील. रवींद्र सेनगावकर, पोलिसअायुक्त
ठळक मुद्दे....
Áतेरा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे
Á६०व्हीडीअो शूटिंग कॅमेरे
Áमुख्यमिरवणूक मार्गावर वाहतूक बंदी
Áनागरिकांनीपर्यायी मार्गांचा वापर करावा
Áशनिवारीमिरवणूक मार्गावर पोलिसांचा रूटमार्च
Áपोलिसमुख्यालयात अधिकारी, कर्मचारी यांना सूचना देण्यासाठी बैठक झाली
Á७०डेसिबलपेक्षा जास्त डाॅल्बीचा अावाज ठेवता येणार नाही
Áरात्रीबारापर्यंत वाद्ये वाजविण्यास परवानगी
युवक प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना अल्पोपहार : शहरातील युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिरवणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना दोन शेंगा लाडू, दोन धपाटे आणि ५०० मिली पाण्याची बाटली असा अल्पोपहार देण्यात येणार आहे. पारस इस्टेट येथील पार्किंगपासून या उपक्रमाची सुरुवात होईल. शिवाजी चौक, आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन येथील बंदोबस्तासाठी तैनात जवानांना आहार वाटप करण्यात येईल. १५०० पोलिस जवानांना अल्पोपहार देण्यात येईल, असे युवक प्रतिष्ठानचे राज सलगर यांनी सांगितले.

बुद्धदर्शनतर्फे संसद भवनाचा देखावा : बुद्धदर्शन मंडळाच्या संसद भवनाच्या देखाव्याचे आकर्षण आहे. याशिवाय महू गाव, घटना आणि बाबासाहेबांच्या संदेशाचा देखावा असेल. जीएम संस्थेच्या वतीने मिरवणुकीत कसबे तडवळे येथील महार, मांग वतनदार परिषद आणि ५१ बैलगाडीचा देखावा असणार आहे. प्रशिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे गरुड रथ, ड्रोनद्वारे छायाचित्रण, नाशिक ढोल तसेच कथ्थक नृत्याचे आकर्षण राहणार आहे. शाहू प्रतिष्ठानतर्फे दीक्षाभूमीचा देखावा सादर केला आहे.