आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाहुबली’चा शहरात २८ लाखांचा गल्ला : आठ लाखांचा करमणूक कर वसूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- बाहुबली चित्रपटामुळे सोलापुरात मिळालेल्या २७ लाख ८४ हजार उत्पन्नातून करमणूक खात्याला सुमारे आठ लाखांचा कर मिळाला. सुमारे २४० कोटींचे बजेट असलेल्या चित्रपटाला देशात बॉक्स ऑफीसवर १०० कोटींपुढे उत्पन्न मिळाले. तो १० जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. दोन आठवड्यांच्या आत चित्रपटाने मोठे उत्पन्न मिळवले. सोलापुरात चित्रपटगृहांत तो झळकला.

बहुतांशवेळी चित्रपटगृहाऐवजी अन्य पर्याय वापरून चित्रपट पाहण्याचा प्रयत्न प्रेक्षक करतात. मात्र, बाहुबलीच्या भव्यतेमुळे चित्रपटगृहात पाहणे लोकांनी पसंत केले.

उत्तम कर जमला
आजवरअनेक चित्रपट आले गेले. मात्र, या चित्रपटाने सोलापूरच्या करमणूक खात्याचे उत्पन्न वाढवण्याचे काम केले आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून त्याचा उपयोग करमणूक खात्याला होणार आहे.” महादेवभवरी, करमणूक अधिकारी, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...