आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार विजयसिंह मोहितेंना जामीन मंजूर; विठ्ठल कारखाना धनादेश वटल्याचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- ऊस बिलाचा धनादेश वटल्याप्रकरणी गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी करकंब येथील “विजय शुगर्स’चे प्रमुख खासदार विजयसिंह मोहिते यांनी सोमवारी न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयाने त्यांना वॉरंट बजावले होते. सोमवारी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. 

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने चार वर्षांपूर्वी विजय शुगर्सला अतिरिक्त असलेला ऊस गाळपासाठी दिला होता. या उसाचे बिल कोटी रुपये झाले होते. या बिलापोटी “विजय शुगर्स’ने पाच कोटी ९४ लाख रुपयांचे वेगवेगळे धनादेश विठ्ठल कारखान्याला दिले होते. यातील काही धनादेश वटले नाहीत.
 
दरम्यान वारंवार पैशाची मागणी करूनदेखील विजय शुगर्सच्या संचालकांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विजय शुगर्सच्या संचालकांविरोधात खटला दाखल करण्यात आला. त्याच्या सुनावणीसाठी कारखान्याचे प्रमुख विजयसिंह मोहिते, यांच्यासह संचालकांविरुद्ध वॉरंट बजावले. त्यामुळे खासदार मोहिते स्वत:हून आज न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांची मुक्तता केली. 
बातम्या आणखी आहेत...