आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकरीतील अनुभवावर सुरू केली बेकर्स गॅलरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापुर- वडिलांनीसुरू केलेल्या बेकरी एजन्सीमधील १५ वर्षांचा अनुभव घेऊन सांगोल्यातील एका उच्च शिक्षित तरुणाने ग्रामीण भागातच ‘बेकर्स गॅलरी’ सुरू केली. शहरी भागात असणाऱ्या आर्चिस गॅलरीप्रमाणे त्याची सुरुवात झाली आहे. त्याचा विस्तार करत पंढरपूर, अकलूज येथेही शाखा सुरू झाल्या. सर्व तालुक्यांमध्ये अशा गॅलरीज सुरू करून ग्रामीण भागातच बेकरी उत्पादने पुरवण्याचा मानस नीलेश प्रकाश दौंडे यांनी व्यक्त केला.
प्रकाश दौंडे यांची सांगोल्यात बेकरी एजन्सी होती. व्यवसाय कौशल्य असल्याने पदवीनंतर नीलेश व्यवस्थापनशास्त्र विभागाकडे (एमबीए)कडे वळले. एमबीए झाल्यानंतर गाव सोडून यशस्वी उद्योजकांच्या शोधात भ्रमंती सुरू केली. त्यांची माहिती काढून अभ्यासात रमले. त्यातूनच त्यांना ‘बेकर्स गॅलरी’ची संकल्पना सुचली. परंतु अशा गॅलरी ग्रामीण भागात चालणार का? असा प्रश्न होता. बेकरीची उत्पादने घेण्यासाठी ग्रामीण भागात चांगला ग्राहक आहे, असे वाटले. ग्राहक चांगल्या उत्पादनांच्या शोधातच होता. त्याची सोय गावातच केल्याने सोय झाली. अशाच ग्राहकांची भूक भागवण्यासाठी पंढरपूर आणि अकलूजही गाठले. तिथेही ग्राहकांची पसंती मिळवली.

केवळ दोन वर्षांत...
सांगोल्यातप्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या बेकर्स गॅलरीने अल्पावधीच लोकप्रियता मिळवली. कोल्ड केक, पिझ्झा, बर्गर खाणारा ग्राहक ग्रामीण भागात आहे. तो त्यासाठी शहरात यायचा, ही बाब सिद्ध झाली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पंढरपूरमध्ये नवीन आऊटलेट काढण्याचा धाडसी निर्णय नीलेशने घेतला. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर अकलूजलाही शाखा सुरू केली. फ्रँचाइझी देत हा व्यवसाय वाढवणार असल्याचे श्री. नीलेश सांगतात.

ग्राहकांची आवड जाणली
ग्रामीणभागातील ग्राहकांच्या आवडी-निवडींची पारख केल्यानेच व्यवसायाचा विस्तार झाला. कुणाचे पाठबळ नाही, पुरेसे पैसे नाहीत, तरीही धाडसाने िनर्णय घेतले. जिद्द आणि कष्टाशिवाय यश नाही. नीलेशदाैंडे, संचालक, बेकर्स गॅलरी
बातम्या आणखी आहेत...