आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडे ७/१२ वरच, पण मिळत नाही ताडी, ताडी विक्रीवर बंदीची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ताडीची कागदोपत्री नोंद असताना शहरातील ताडी दुकानांतून विषारी रसायन मिश्रित ताडीची विक्री होते, ही ताडी विक्री बंद करावी आणि शुक्रवारी नवीन दुकानासाठी होणारे लिलाव रद्द करावे, या मागणीचे निवेदन जनवादी महिला संघटना, लोकशाही युवा संघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रमेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
रसायनमिश्रित ताडी पिल्याने मागील सहा महिन्यात अनेक तरूणांचे बळी गेले आहेत. एकीकडे झाडे नसताना नवीन दुकानांचा लिलाव घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असून जिल्हाधिकारी यांनी लिलाव रद्द करावेत आणि ताडी विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी जनवादी महिला संघटनेचे नसीमा शेख, लिंगव्वा सोलापुरे, सुनंदा बल्ला, नंदा गुळसकर, नागूबाई माढेकर, फातिमा पठाण, रशिदा शेख, लता तुळजापूरकर, चंदा उबाळे उपस्थित होते. अजीज पटेल, प्रशांत म्याकल, श्रीधर आसादे, रवी म्हेत्रे, रवी गोणे, अनिल वासम आदी उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यात२३ हजार ५२३ झाडे असल्याचे दाखवत नवीन १२ आणि नूतनीकरण केलेले अशा १५ दुकानांचा लिलाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्य उत्पादन शुल्क यांनी शुक्रवारी काढला आहे. संबंधित गावातील सात-बारा उताऱ्यावर जी ताडीची झाडे दाखविली आहेत, यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाडांमधून ताडी मिळूच शकत नाही. कारण ती अद्याप अपरिपक्व अाहेत. फक्त नवीन दुकानांची संख्या वाढविण्यासाठी झाडांच्या संख्येत वाढ करण्यासाठी जिल्हा प्रशासन राज्य उत्पादन शुल्क प्रयत्न करीत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सध्या ग्रामीणमध्ये आणि शहरात अशा एकूण १५ दुकानांना आहे त्या झाडांपासून ताडी उपलब्ध होत नसताना पुन्हा नव्याने १२ दुकानांसाठी लिलाव काढण्यात येत आहे.

लिलावाच्या एक दिवस अगोदर दक्षिण तालुक्यातील औराद येथील मलिकय्या गुत्तेदार कुरघोट येथील अन्वर चांदपाशा पटेल यांच्या उताऱ्यावरील ताडाच्या झाडांची पाहणी केली. गुत्तेदार यांच्या उताऱ्यावर हजार ५०० झाडे असली तरी ताडी मिळणारी २०० झाडे आहेत. उर्वरित झाडे अपरिपक्व आहेत. कुरघोट येथील अन्वर पटेल यांच्या शेतात ३०० ते ५०० ताडाची झाडे आढळून आली. उताऱ्यावर हजार झाडे असल्याची नोंद आहे. त्यामुळे नवीन काढलेल्या दुकानांना ताडी उपलब्ध होणार का, असा प्रश्न आहे. एकंदरीत कागदोपत्री नोंदीवरून जिल्हा प्रशासन राज्य उत्पादन शुल्क १५ दुकानांचा लिलाव काढत आहे. शहरातील आणि ग्रामीणमधील १२ अशा एकूण १५ दुकानांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी लिलाव होणार आहे. गुरुवारी दुपारी वाजेपर्यंत एकाही इच्छुकांनी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे निविदा भरली नसल्याचे अधीक्षक सागर धोमकर यांनी स्पष्ट केले.
औराद येथे ताडाची झाडे आहेत. पण त्यापासून अजून तीन वर्षे तरी प्रत्यक्ष ताडी उपलब्ध होऊ शकणार नाही.
ताडी लिलावास जनवादी,लोकशाही युवा संघाचा विरोध

ताडी दुकानाचे लिलाव होणारच...
तलाठीराज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या पाहणीतून झाडांची संख्या समोर आली आहे. झाडांच्या संख्येनुसार १५ दुकानांसाठी लिलाव प्रक्रिया होईल. ज्याठिकाणी झाडे नाहीत, त्याठिकाणी तपासणी करण्यात येईल. झाडे कमी असतील तर ठेका दिलेल्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी.

ही आहेत १२ नवीन दुकाने...
दक्षिणसोलापूर तालुक्यातील मंद्रूप टाकळी, माढा तालुक्यातील माढा, कुर्डुवाडी टेंभुर्णी, पंढरपूर तालुक्यातील करकंब, सांगोला तालुक्यातील अकोला, अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, शहरातील मजरेवाडी याठिकाणी नवीन दुकानांसाठी लिलाव होणार आहे तर जोडभावी पेठ, बेगमपेठ बार्शी येथील दुकानांचे फेरलिलाव होणार आहेत.

जिल्ह्यात २३ हजार ५२३ ताडाची झाडे ...
दक्षिणसोलापूर ५४५०, उत्तर सोलापूर १५०, मोहोळ १६१५, पंढरपूर ४४५०, बार्शी २८१७, माढा २००, करमाळा १००, मंगळवेढा ५१९५, सांगोला २४३५ माळशिरस ११२० अशी एकूण २३ हजार ५२३ ताडीची झाडे असल्याचा दावा जिल्हा प्रशासन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे.

अशी आहे शक्यता...
५००झाडांमागे एक दुकान असा नियम आहे. दुकानांची संख्या वाढवण्यासाठी उताऱ्यावर झाडांची संख्या वाढवण्यात आली, प्रत्यक्षात जमिनीवर झाडांची संख्या असली तरी ताडी मिळणाऱ्या झाडांची संख्या खूपच नगण्य आहे. राज्य उत्पादन शुल्क महसूल प्रशासनाने एका ठिकाणी तरी प्रत्यक्षात पाहणी केली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील दुकानांमध्ये झाडापासून मिळणारी ताडी येतच नसून उलट रसायनमिश्रित ताडी करून विक्री केली जाते. यामुळे गेल्या सहा महिन्यांत अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे.