आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक आजपासून पीक कर्ज वाटप करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँक गुरुवारपासून पीक कर्ज वाटप सुरू करत आहे. ऊस लागवड, संगोपनासाठी कर्ज घेताना ठिबक सिंचन असणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कर्ज मिळणार नाही, असे बँकेचे अध्यक्ष दिलीप माने यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार जिल्हा बँकेने भांडवल पर्याप्तता निधी (एसएलआर) आणि रोखता तरलता (सीआरआर) याचे काटेकोर पालन करण्यासाठी जून आणि जुलै महिन्यात पीक कर्ज वाटप बंद केले होते. एसएलआर आणि सीआरआरचे उल्लंघन केल्यामुळे तीन वर्षांपूर्वी बँकेला मोठा दंडही झाला होता.

यंदा राज्य बँकेकडे एकूण ४८९ कोटींची ठेव ठेवण्यात आली असून तेवढेच कर्जही घेण्यात आले आहे. गर्व्हमेंट सेक्युरिटीसाठी ७८ कोटी रुपयांची ठेवही ठेवण्यात आली आहे. आता नव्याने पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पीक कर्ज देताना सोसायट्यांचे सचिव, बँक अधिकारी शेतात पीक असल्याचे पाहतील. शिवाय शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा शेतात पीक असल्याचा दाखला देणे बंधनकारक असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

बरूर येथे थकबाकी असताना कर्ज वाटप : बरूर(ता. दक्षिण सोलापूर) येथील २३ एकर जमिनीवर थकबाकी असतानाही चार शेतकऱ्यांच्या नावावर जवळपास २१ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या व्यक्ती एका संचालकांशी संबंधित आहेत. या प्रकरणात काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या २४ एकर जमिनीवर थकबाकी असतानाही २९ लाख ४० हजार कर्ज वाटप करण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे माने यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर’मध्ये अनेक बोगस प्रकार
दक्षिणसोलापूर तालुक्यातील काही विकास सेवा सोसायट्यांनी बोगस पीक कर्जवाटप झाल्याच्या तक्रारी आहेत. कामात कुचराई केल्याप्रकरणी डी. एन. पाटील, बी. एस. माड्याळ, पी.एस. हाल्लोळी या तीन बँक निरीक्षकांची पदावनती करण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. त्याचबरोबर काही सचिवांना निलंबित करण्यात आले आहे.

खैराव प्रकरणाचा अहवाल मागवला
मानेगाव(ता. माढा) शाखेने खैराव येथील एका संस्थेला बोगस पीक कर्ज वाटप केल्याचा आरोप बँकेचे ज्येष्ठ संचालक एस.एम.पाटील यांनी नुकताच केला होता. या प्रकरणाचा अहवाल मागवला असून दोषींवर कारवाई होईल, असे माने यांनी सांगितले.

त्यांनी कर्जे दिली, मी वसुलीच करतोय : काहीकारखान्यांना मी अध्यक्ष होण्यापूर्वी अनेकांनी कर्जे दिली आहेत. त्याच्या वसुलीची कामे मी करतोय. वसुली करताना बँकेच्या विरोधातील न्यायालयीन लढाई लढण्याचे कामही मलाच करावे लागतेय, असेही माने यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...