आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमठा नाका महाराष्ट्र बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुमठानाका जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅँक ऑफ महाराष्ट्र, मजरेवाडी शाखेत मंगळवारी पहाटे दोन अज्ञात चोरट्यांनी लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. चोरांचा प्रयत्न फेल झाल्यामुळे खातेदारांचे पैसे सहीसलामत राहिले. याबाबत बॅँक मॅनेजर सुधाकर बंडारू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवारी पहाटे सुमारे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी बाथरूमच्या खिडकीची जाळी उचकटून बँकेत प्रवेश केला. लॉकर रुमची लहानशी खिडकी उचकटून त्यांनी रुममध्ये प्रवेश केला. तेथील खातेदारांचे लॉकर उघडण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. चोरांना लाॅकर उघडणे शक्य झाले नाही. दरम्यान, दिवस उजाडत होता. त्यामुळे या दोघांनी पळ काढला. त्याआधी त्यांनी स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही कॅमेरा रॉडने फोडला. ही सर्व क्षणचित्रे बॅँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

त्या दोघा चोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. हातात हॅन्डग्लोज होते. मंगळवारी सकाळी जेव्हा कर्मचारी बॅँक उघडण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याची खबर मिळताच पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी तेथे उपस्थित होते. श्वान पथक बोलावण्यात आले होते. श्वानाने कुठलीही दिशा दाखवली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ईश्वर कोकरे करीत आहेत.

बॅँकेची इमारत असुरक्षित
बॅँकेची इमारत ही क्रीडा संकुलाच्या कॉम्प्लेक्समध्ये आहे. मैदानाच्या दिशेने बाथरुमची खिडकी आहे. या खिडकीला एक लोखंडी जाळी आहे. ही जाळी मजबूत नसल्यामुळे ती सहज उचकटता आली. तेथून बॅँकेत प्रवेश केल्यानंतर लॉकर रुमची खिडकीही सहज उचकटण्यात आली. सायरन हे केवळ लॉकर रुमच्या प्रवेशद्वाराला होते. चोर खिडकीतून आल्यामुळे सायरन वाजले नाही. या बॅँकेत रात्री एकही वॉचमन नाही.

बातम्या आणखी आहेत...