आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२५ बँक मित्र देत अाहेत घरपोच बँकिंग सेवा खाते उघडणे, पैसे भरून घेणे, देणे आदी सुविधा देतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटाबंदीनंतर बँकांवर प्रचंड ताण पडला आहे. चलन तुटवड्याने तर चक्क बँका बंद ठेवण्याची वेळ आली. अशा स्थितीत बँक मित्रांचे काम मात्र जोरात आहे. घरोघरी जाणे, बँक खाती उघडणे, पैसे भरून घेणे आणि देणे अशी कामे ते करत आहेत. स्टेट बँक आणि बँक ऑफ इंडियाचे २५ बँक मित्र घरोघरी ही बँकिंग सेवा देताहेत. अर्थातच बँकांकडून दिली जाणारी ही प्राथमिक सेवा आहे. सामान्य माणूस बँकांशी जोडला जावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे बँक व्यवस्थापन सांगते.

सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत बँक मित्र ठरलेल्या परिसरात फिरतात. प्रामुख्याने कामगार, त्यांची शिष्यवृत्ती घेणारी मुले यांच्याकडे चौकशी करतात. बँकांची माहिती देतात. खाती उघडण्याचे फॉर्म भरून घेतात. तिथेच पावती देऊन नंतर पासबुकही वितरित करतात, अशी माहिती बँक मित्र ग्रुपचे प्रमुख मनोज मोरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. बहुतांश कामगार, छाेट्या व्यावसायिकांचे अद्यापही बँकांमध्ये खाती नाहीत. त्यांच्यापर्यंत पोचून सेवा देण्यासाठी बँक मित्र काम करतात, असेही श्री. मोरे म्हणाले.

बँक आपल्या दारी संकल्पना
सामान्यग्राहक बँकांशी जोडला जावा, यासाठी मध्यंतरीच्या काळात ‘जन-धन योजना’ आली होती. नि:शुल्क रकमेतून त्याच्या खाती उघडण्यात आल्या. ग्रामीण भागातील शेतमजूर ते शहरी भागातील घरकाम करणाऱ्या महिलांनी त्यास प्रतिसाद दिला. शहर आणि जिल्ह्यात साधारण लाख अशी खाती आहेत. त्यावर सुमारे ८० कोटी रुपये जमाही झाले. अशा खात्यांना शासनाच्या लाभ योजनाही ‘आधार’ची साह्याने जोडल्या गेल्या. त्यामुळे या खात्यांवर सरकारी अनुदानही जमा होते. जसे-घरगुती गॅसवरील अनुदान, शालेय शिष्यवृत्ती आदी. बँक आपल्या दारी अशी ही संकल्पना असल्याचे बँक मित्र समन्वयक अमोल सांगळे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...