आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टाची बँक लवकरच सुरू होणार, बँकिंगच्या सर्व सुविधा देणार, खेड्यांपर्यंत विस्तारणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्य कार्यालयातील पोस्टाचे एटीएम सेंटर. - Divya Marathi
मुख्य कार्यालयातील पोस्टाचे एटीएम सेंटर.
सोलापूर - टपालखाते पोस्ट पेमेंट बँक सेवा सुरू करणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका खेड्यापर्यंत जाण्यास उदासीन दिसतात. त्यामुळे खेड्यापर्यंत बँकेची सेवा पोहोचली नाही. अनेक शेतकऱ्यांना गावात बँक नसल्यामुळे शहर किंवा नजीकच्या मोठ्या गावात पदरमोड करून जावे लागते. बँकिंग क्षेत्राला खेड्यापर्यंत नेण्यासाठी नव्याने यंत्रणा उभी करता, खेड्यापर्यंत पोहोचलेल्या पोस्ट खात्याची रचना बदलत आहे. 
 
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पहिली इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) सुरू होत आहे. पहिली बँक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने खेड्यापर्यंत जाळे विस्तारण्यात येणार आहे. 
 
पोस्टातून सर्व प्रकारचे बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. गोवा विभागांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पेमेंट बँक सुरू होणार आहे. यामुळे ग्राहकांना पोस्टाच्या माध्यमातून बँकिंग सेवा मिळणार आहे. देशभरातील टपाल कार्यालयांना बँकांचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. 
 
देशभरात पोस्ट बँकेच्या ६५० शाखा सुरू करण्यात येणार आहेत. गोवा क्षेत्रात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि संपूर्ण गोवा राज्याचा समावेश होतो. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ जिल्ह्यातील सर्वच पोस्ट कार्यालये कोअर बँकिंग प्रणालीशी जोडली आहेत. 
 
शहरासह ग्रामीण भागातील टपाल कार्यालये संगणकीकृत झाली आहेत. बचत बँक, आरडी, मुदत ठेव, वरिष्ठ नागरिक योजना, पीपीएफ, मंथली इन्कम स्किम, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे सर्व व्यवहार आता ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. 
 
मुख्य कार्यालयातून आरंभ 
रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य कार्यालयात पहिल्यांदा ही नवीन पेमेंट बँक सेवा सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तालुका, ग्रामीण भागातील कार्यालयात ही सेवा सुरू करण्यात येईल. बँकेसाठी जागा निश्चित झाली असून, बँकिंग डाटाही तयार झाला आहे. पेमेंट बँक सुरू झाल्यानंतर मोबाइल कंपन्या, अन्य संस्थांना व्यक्ती अथवा छोट्या उद्योगांना सेवा देता येणार आहे. पेमेंट बँकेची रचना वेगळ्या पद्धतीने केली जाणार आहे. त्यांना ठेवी स्वीकारणे, दुसरीकडे पैसे पाठवणे, इंटरनेट बँकिंग आणि अन्य विशेष सेवांपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...