आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८०० ‘पॉस’ची मागणी, बँकांनी पुरवली २५०, बँक ऑफ इंडियाने दिले एकूण ७५ पॉस मशीन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नोटाबंदीनंतरप्रचंड चलन तुटवडा निर्माण झाला. बँकांमध्ये पैसे नसल्याने व्यवहार ठप्प झाले. दुसरीकडे ‘कॅशलेस’ व्यवहारांना चालनाही मिळत अाहे. त्यासाठी बँकांनीही पुढाकार घेतला. टपरीचालक ते बड्या व्यापाऱ्यांना ‘पॉस’ (पॉइंट ऑफ सेल) मशीन देणे सुरू केले. त्यासाठी अनामत रक्कम नाही, नोंदणी केल्यानंतर लगेच जोडणी असे धोरण स्वीकारले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी ग्राहक व्यापाऱ्यांची सोय झाली.

आतापर्यंत पॉस प्रणाली काही पेट्रोलपंप आणि मोठ्या दालनांमध्ये उपलब्ध होती. अाता साधारण सर्व बँकांनी मिळून सुमारे २५० ‘पॉस’ मशीन दिले. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी शुक्रवारी व्यापारी आणि बँक प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. व्यापाऱ्यांनी पॉस मशीनची नोंदणीबँकांकडे करावी. त्यानुसार बँकांनी तातडीने त्याचा पुरवठा करावा, असे ठरले. सुमारे ८०० व्यापाऱ्यांकडून अशा पद्धतीची नोंदणी झाल्याचे बँकांनी सांगितले. सर्वांनाच मशीन मिळाल्यास काही प्रमुख व्यापारपेठा कॅशलेस व्यवहार करतील, असेही सांगण्यात आले.

कोणघेऊ शकतात..?
दूधवाले,पेपर विक्रेते, पाणीपुरी, भेळ गाडीवाल्यांपासून बड्या व्यापाऱ्याला हे मशीन घेता येते. त्यासाठी १०० रुपयांचा बाँड, बँकेत चालू खाते (करंट अकाऊंट) महिन्याची उलाढाल किमान हजार रुपये असणे आवश्यक आहे. हजार रुपयांपर्यंत ०.७५, हजार रुपयांच्या वर टक्का आणि १० हजारांच्या पुढे रुपये जमा झाल्यास दीडटक्के शुल्क आकारले जाते, असे बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रतिसाद वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

पॉसप्रणाली काय आहे?
पॉसमशीन हे पूर्णत: परदेशी बनावटीचे उपकरण आहे. त्यावर रुपी, क्रेडिट, डेबिट व्हिसा अशी कार्डे स्वाइप करता येतात. ०.७५ टक्क्यांपासून १.७५ टक्क्यांपर्यंत प्रती हजार रुपयांच्या बदल्यात बँकेला मोबदला द्यावा लागतो. पूर्वी दूरध्वनी असल्याने त्याची जोडणी त्याला होती. आता तंत्रज्ञान बदलल्याने ते वायरलेस झाले. त्याला ‘जीपीआरएस पॉस मशीन’ म्हणतात. ते कोठेही घेऊन जाता येते.

तातडीने सुविधा देऊ
कॅशलेसव्यवहारवाढण्यासाठी मागतील त्यांना पॉस प्रणाली पुरवण्याच्या सूचना आहेत. अधिकाधिक व्यापारी वर्ग यात जोडला जावा, यासाठी अनामत रक्कम माफ केली आहे. व्यापाऱ्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. सर्वांनाच पुरवण्याचे नियोजन केले.” - अमितकिलनाहके, सहायक व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा, डफरीन चौक शाखा

७५ नोंदणी, ३५ दिले
बँकऑफइंडियाकडे ७५ व्यापाऱ्यांनी पॉस प्रणालीसाठी मागणी नोंदवली. पैकी ३५ कार्यान्वित झाले. नवीन वायरलेस जीपीआरएस मशीनही वितरित करण्यात येत आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव माफ करण्यात आली. मागतील त्यांना हे दिले जात आहे.” - मनीषपाठक, वितरण व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, जुना एम्प्लॉयमेंट शाखा

कार्ड वापरून रेल्वेचे तिकीट काढता येणार आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकावरील आरक्षित अनारक्षित तिकीट केंद्रावर पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशीन बसविले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात देशातील महत्त्वाचे वन दर्जाच्या स्थानकावर ही सोय उपलब्ध असेल. यात सोलापूरसह राज्यातील पुणे, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर, जळगाव, भुसावळ आदी महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. देशातील सुमारे १२ हजार तिकीट केंद्रांसाठी १५ हजार पॉस मशीन लागणार आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत बहुतांश रेल्वे स्थानकावर पॉस मशीन बसविले जातील, असे रेल्वे मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार सक्सेना (नवी दिल्ली) यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...