आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barshi Identity Documentary First In Mumbai Documentaries Festival

मुंबई लघुपट महोत्सवात बार्शीची ‘आयडेंटीटी’ नंबर वन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - येथील दिग्दर्शक अमर देवकर यांच्या मानवता निर्मिती मंच निर्मित ‘आयडेंटीटी’ या लघुपटाला एरोली (नवी मुंबई) येथील लघुपट महोत्सवात पहिला क्रमांक मिळाला. अखिल भारतीय मराठी नाट्य शाखेच्या वतीने या राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होेते. माणसांच्या जीवनात जात, धर्मांच्या खुणा गळून पडल्या की, केवळ माणूस उरतो. याच विचारांवर बार्शीच्या मानवता निर्मिती मंचने ‘आयडेंटीटी’ या लघुपटाची निर्मिती केली. स्थानिक नवख्या कलाकारांना घेऊन निर्मिती केलेला हा लघुपट ऐरोली येथील अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लघुपट महोत्सवात उपस्थितांचा आकर्षणबिंदू ठरला.

कलाकारांचा अभिनय, प्रसंग आणि लघुपटाने दिलेला संदेश परीक्षकांच्या पसंतीस उतरला आणि राज्यस्तरीय महोत्सवातील ‘नंबर वन’चा मान बार्शीच्या ‘आयडेंटीटी’ला मिळाला. या महोत्सवात राज्यभरातून ६५ लघुपटांचा सहभाग होता.

अभिनेत्री आदिती सारंगधर अभिनेता पवन मल्होत्रा, अशोक समर्थ यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिग्दर्शक अमर देवकर प्रदीप पाटोळे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, विजू माने अमित राय, राजेश फडतरे, रमेश वाणी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सामाजिक बोध, उत्तम छायाचित्रण, संकलन, अभिनय, पटकथा या मानबिंदूवर परीक्षकांचा भर होता. यामध्ये बार्शीचीच अखेर सरशी झाली. या राज्यस्तरीय महोत्सवात उत्कृष्ट लघुपटाबरोरबच उत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा लेखक म्हणून बार्शीचे दिग्दर्शक अमर देवकर हेच नंबर वन ठरले.
एरोली नाट्य शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले, अभिनेता कमलेश सावंत, अभिनेत्री नयना आपटे, दिग्दर्शक संजय क्षेमकल्याणी, राजू मेश्राम, मनीषा कवडे आदी उपस्थित होते. जयभीम शिंदे यांच्या संगीताचा वाटा महत्त्वाचा. साजीद बागवान, गिरीश देवकते, अतुल लोखंडे, विनोद कांबळे, अभय चव्हाण, समाधान सर्वगोड, महेश क्षीरसागर, आनंद मनसुख, आकाश बनसोडे, सचिन अंकुशराव, अमोल चौधरी, उमेश मालन, पूजा काळे, सूरज काळे, उदय मोहिते यांच्या टीमने परिश्रम घेतले.
बार्शी. अभिनेता अशोक समर्थ आदिती सारंगधर यांच्या हस्ते प्रथम लघुपटाचे पारितोषिक स्वीकारताना ‘आयडेंटीटी’चे दिग्दर्शक अमर देवकर सहकारी प्रदीप पाटोळे आदी.