आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा हजार चौरस मीटर जागेत होणार बसपोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील महत्त्वाच्या शहरात अाधुनिक सुविधांनीयुक्त बसपोर्ट साकारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. या योजनेत सोलापूरचा समावेश झाला आहे. जुना पुणे नाका परिसरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १५ चौरस मीटर जागेत बसपोर्ट उभारण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. या आधुनिक बसस्थानकाचा प्रवाशांना लाभ होणार आहे.
प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा विचार करून राज्यातील प्रमुख शहरात आधुनिक बसस्थानके (बसपोर्ट) उभारण्याची शासनाची संकल्पना आहे. परिवहन विभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे. दोन दिवसांपूर्वी परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी परिवहनमंत्री रावते यांची भेट घेतली. तसेच बसपोर्ट संकल्पनेत सोलापूरचा समावेश करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत बसपोर्ट संकल्पनेत सोलापूरचा समावेश करण्यात आल्याचे परिवहनमंत्री रावते यांनी सांगितले. शिवाजी चौकातील बसस्थानकाची जागा अपुरी पडत आहे. जुना पुणे नाका येथे राज्य परिवहन महामंडळाची मोठी जागा आहे. त्याठिकाणी नवीन बसस्थानक उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती. त्याला गती मिळणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरचा ताण कमी होणार
सोलापूरमध्यवर्ती बसस्थानकावर रोज सुमारे १००० बसगाड्या धावतात. त्याचा सुमारे ४० ते ५० हजार प्रवासी लाभ घेतात. एसटी वर्दळीच्या मानाने शहरातील ही जागा अपुरी पडत आहे. जागाच अपुरी पडत असल्याने प्रवाशांच्या सुविधेचेही प्रश्न निर्माण झालेले आहेत. बसस्थानक झाल्यास येथील ताण कमी होईल.
सोई सुविधांत वाढ करण्यात येणार
बस स्थानकाच्या अत्याधुनिकरणाला बसपोर्ट हा शब्द वापरला गेला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा शब्द वापरला जात आहे. बसस्थानकाचे अत्याधुनिकरण करताना प्रवाशांच्या सोई सुविधांत वाढ करण्यात येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकाचे रुपांतर बसपोर्टमध्ये केले जाणार आहे. यात बसस्थानकावर सुसज्ज असे यात्री निवास बांधण्यात येईल. चांगल्या दर्जाचे हॉटेल यात सामान्यांना परवडेल अशा किमतीत खाद्यपदार्थ मिळेल, सभागृह सोबत कमर्शियल कॉम्प्लेक्स देखील उभारले जाणार आहे.
...निधी देणार
सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून सुविधांची वानवा आहे. ड्रेनेजचे पाणी खराब झालेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत राज्यमंत्री देशमुख यांनी परिवहन मंत्री रावते यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकासासाठी लवकरच निधी देणार असल्याचे रावते यांनी सांगितले.
बसपोर्ट संकल्पनेत सोलापूरचा समावेश
राज्यात बसपोर्ट संकल्पना राबविण्याचा मानस आहे. यासाठी नेमका किती खर्च येईल, याचे निकष काय असतील, यात कोणत्या शहरांचा समावेश असेल हे आत्ताच सांगता येणार नाही. सोलापूरविषयी विजय देशमुख यांच्याशी चर्चा झाली. यात सोलापूरचा समावेश नक्की करणार.'' दिवाकर रावते, परिवहनमंत्री