आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टसारखे सोयींनी युक्त असेल सोलापूरचे ‘बसपोर्ट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक बसपोर्ट (बसतळ) बांधण्यात येणार आहे. त्याचे काम तीन महिन्यांत सुरू होणार आहे. राज्य सरकरने एसटी स्टॅण्ड बांधण्यासाठी नवी योजना जाहीर केली आहे. त्यात सोलापूरसह राज्यातील १३ शहरांचा समावेश केला आहे. नव्या बसपोर्टसाठी प्रत्येकी ३० कोटी रुपये तरतूद करण्यात येणार आहे.
बसपोर्ट संकल्पना ही आहे त्या बसस्टॅण्डचा विकास करणे नाही तर संपूर्ण बसस्टॅण्ड नव्याने बांधणे आहे. तेथे अद्ययावत सुविधा असतील. हॉटेल्ससह येथे प्रवाशांच्या मनोरंजनासाठी १०० अासनी सिनेमागृह असणार आहे. प्रवाशांच्या निवासासाठी निवासगृह असेल. एक बसपोर्ट बांधण्यासाठी सुमारे ३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सोलापुरातील पुणे नाका परिसरात एसटीची सुमारे १५ हजार चौरस मीटर जागा आहे. तेथे हे बसपोर्ट बांधण्यात येईल.

आराखड्याचे काम सुरु
पहिल्या टप्प्यात राज्य परिवहन महामंडळाने १३ शहरे निवडली आहेत. यात सोलापूर, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अकाेला, अमरावती आदींचा समावेश आहे. निविदा काढून काम केले जाईल. आराखडा तयार करण्याचे काम सुुरू अाहे. कामास महिन्यांनंतर सुुरुवात होणार आहे.


आराखडा तयार करण्याचे काम सुरू : दोन ते अडीच एकर जागेची गरज असते. सोलापूरची जागा त्याहून अधिक आहे. बसपोर्ट प्रशस्त वाटावी, अशी अंतर्गत रचना असणार आहे. आराखड्याचे काम महामंडळाच्या अभियंत्यांकडून सुरू आहे.
महिन्यांत काम सुरू होईल
एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट उभारले जाणार आहे. महिन्यांत काम सुरू होईल. विशेष अधिकारी नेमण्यात येईल.” संजय खंदारे, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई
वैशिष्‍ट्ये -
बसस्थानकाच्या उत्पन्नचाही यात विचार केला आहे.
शहराचा आर्थिक स्तर चांगला उंचावलेला हवा.
अन्य शहरांशी राज्याशी जोडणी चांगली हवी.
प्रवाशांची गाडींची संख्या अधिक असायला हवी.
बसपोर्ट म्हणजे बसस्थानकाचे नूतनीकरण नाही.
बसपोर्ट संपूर्ण नव्याने बांधण्यात येणार आहे.