आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान.. आता तुमच्यावरही अाहे ‘तिसऱ्या डाेळ्या’ची नजर !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई :  शरद(नाव बदललेले आहे) ‘टीस’ या कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत. नुकताच नोकरीला लागला होता आणि कामही चांगले करीत होता, परंतु कंपनीने एका संस्थेमार्फत त्याची खासगी माहिती काढली असता सारेच थक्क झाले.
शरद एकाच वेळी चक्क दाेन कंपन्यांमध्ये नाेकरीस हाेता, त्याने पॅन कार्डही तयार केले होते, अशी माहिती संबंधित शाेधकाम करणाऱ्या कंपनीने ‘टीस’ला दिली अाणि व्यवस्थापनाने शरदला तडकाफडकी कामावरून काढून टाकले. अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक व्यक्तींची माहिती काढून देण्याचे काम ही कंपनी करत अाहे. 
ट्रॅग इनव्हेस्टिगेशन इंडिया प्रा. लि. असे या खासगी माहितीचे शाेधकाम करणाऱ्या कंपनीचे नाव अाहे. देशातील अनेक मोठ्या बँका, विमा कंपन्यांनी या कंपनीकडे काही शाेधकार्य साेपवलेले अाहे. विमा कंपनीतून निवृत्ती घेऊन महेश भंभवानी यांनी काही निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने या संस्थेची स्थापना केली आहे. त्याबाबत भंभवानी यांनी सांगितले, देशामध्ये ह्युमन स्कोअरिंग करणारी आमची पहिलीच कंपनी आहे.
अनेकदा बँकांमध्ये मोठ्या रकमेची कर्जे घेण्यासाठी काही जण येतात. तेव्हा त्या व्यक्तीची खासगी माहिती मिळवण्याचे काम अामच्यावर साेपवले जाते. ती व्यक्ती कर्ज फेडण्यास सक्षम आहे का? त्याच्यावर गुन्हे आहेत का? ही माहिती अाम्ही संबंधित बँकेला मिळवून देतो.
तसेच एक कोटीपेक्षा जास्त रकमेचा विमा एखाद्याने उतरवला असेल तर त्याचीही वरीलप्रमाणे माहिती आम्ही गोळा करून विमा कंपन्यांना देतो, त्यामुळे बँका आणि विमा कंपन्यांची होणारी फसवणूक टाळता येते. अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्याचे कामही आम्हाला देतात. 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरकाम करणाऱ्या नोकरांची माहिती मिळवणे असल्याचे भांभवानी सांगतात. मुंबईत पाच लाख घर कामगार आणि ड्रायव्हर आहेत. या सगळ्यांची पोलिसांकडे नोंद करणे आवश्यक आहे, परंतु सध्या फक्त १२३० जणांचीच नोंद अाहे.
अपहरणाची जी प्रकरणे होतात त्यात ८२ टक्के हात या घरकामगार वा ड्रायव्हरचा असतो, तर ३४ टक्के असे कर्मचारी चोरीच्या आरोपाखाली पकडले गेले आहेत. सराफा दुकानात नोकर ठेवतानाही आता त्याची माहिती काढण्याचे काम दिले जाते, असे भंभवनी सांगतात. 
बातम्या आणखी आहेत...