आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर मंदिरात विविध कामांना झाली सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - श्रावणमास १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर मंदिरात विविध विकासकामे केली जात आहेत. श्रावणात सोलापूर महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, कर्नाट्क तसेच देशभरातून भाविकांची गर्दी सोलापुरात होत असते. यानिमित्त मंदिरात साफसफाई, स्वच्छता, जाळ्या जळमटे काढणे, अनावश्यक वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे, गवत बागेतील मातीचे सपाटीकरण करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रतिवर्षी श्रावणात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात.
तिसऱ्या श्रावण सोमवारी विविध भागांतून आलेल्या पालख्यांचा एकत्रित पालखी सोहळा असतो. तसेच, महिनाभर भाविक दर्शनासाठी येत असतात. याचा विचार करता भाविकांना त्रास होऊ नये म्हणून या कामांना आताच सुरुवात करण्यात आली आहे. नव्या करण्यात आलेल्या बागेत गवतांची झाडांची कापणी होत असून माती टाकून सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
भाविकांना आवाहन
एरवी सकाळी भाविक परिसरातील नागरिक मंदिर परिसरात फिरण्यास दर्शनास येत असतात. परंतु श्रावणात पहाटे चार वाजल्यापासून दर्शनाची गर्दी असते. तलावाभोवतीच्या परिसरातून भाविकांची ये-जा असते. या परिसरात काही गैरप्रकार आढळले, निदर्शनास आले, मोडतोड होताना दिसली किंवा भाविकांना छेडछाडीचे प्रकार होत असतील तर भाविकांनी त्वरित मंदिर समितीच्या ०२१७ - २७२५०५१ या दूरध्वनी अथवा विश्वस्त नंदकुमार मुस्तारे यांच्या ९३७०७४७४८० या मोबाइलवर संपर्क साधण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.

गुप्तदानासाठी झाला कक्ष
सुवर्ण सिद्धेश्वर अभियानास पूरक म्हणून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोर उभारलेल्या गुप्तदान हुंडीसाठी पूर्वी केवळ कापडी आच्छादन करण्यात आले होते. आता यास एका गुप्त कक्षाचे रूप देऊन चारही बाजूंनी प्लायउड सनमाइक कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.