आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Belgaum Municipal Corporation News In Divya Marathi

बेळगाव महापालिकेवर फडकला मराठीचा झेंडा, सरिता पाटील महापौरपदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा मराठी झेंडा फडकला आहे. बेळगाव विकास आघाडीने सत्तेची हॅटट्रिक साजरी करत कन्नड-उर्दू गटाचे मनसुबे उधळून लावले. मराठी भाषिक गटाच्या सरिता पाटील या महापौरपदी विराजमान झाल्या तर उपमहापौरपदी विकास आघाडीचेच संजय शिंदे विजयी झाले.

बेळगाव महापालिकेतील महापौर-उपमहापौरपदाची गेल्या वेळची निवडणूक खूपच गाजली होती. कन्नड गटाचा महापौर करण्यासाठी मराठी भाषिक उमेदवारांचे अर्जच स्वीकारण्यात आले नव्हते. ‘फोडा आणि राज्य करा', या नितीनुसार मराठी गटातील दुफळीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न कन्नड-उर्दू गटाने केला होता. यावेळीही विकास आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. पण अखेर मराठी ऐक्याचाच विजय झाला, महापालिकेतील आघाडीची सत्ता अबाधित राहिली.
सरीता पाटील यांनी कन्नड-उर्दू गटाच्या जयश्री माळगी यांचा सात मतांनी पराभव केला. पाटील यांना मराठी भाषक नगरसेवकांची सर्वच्या सर्व, म्हणजे ३२ मते मिळाली, तर माळगींच्या पारड्यात २५ मते पडली. कुठलीही फाटाफूट होऊ नये, म्हणून विकास आघाडीचे नगरसेवक कोकणात रवाना झाले होते.