आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वाॅर्डना मिळणार बेस्ट विभाग पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयातील पाच वॉर्डना बेस्ट हॉस्पिटल वाॅर्ड म्हणून पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण मंगळवारी (दि. २६) सकाळी ७.३० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये प्रथम क्र. स्त्री शल्य चिकित्सक वाॅर्ड-२, द्वितीय पुरुष शल्य चिकित्सक वाॅर्ड क्र.१, तृतीय औषधशास्त्र अे. अे. वाॅर्ड, तसेच उत्तेजनार्थ बालरोग स्त्रीरोग वाॅर्ड यांचा समावेश आहे. हा पुरस्कार अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.
सिव्हिलमध्ये एकूण ३१ वाॅर्ड आहेत. त्यापैकी वाॅर्डची निवड समितीकडून निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार निवड करण्यासाठी सात जणांची समिती तयार करण्यात आली होती. जानेवारीच्या पंधरा दिवसामध्ये समितीने सर्व वाॅर्डांची पाहणी करून माहिती गोळा केली. ही माहिती गोळा करण्यासाठी दहा निकष तयार करण्यात आले होते.

या निकषानुसार माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार पाच वॉर्डची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या वाॅर्डला दोन फुटी घड्याळ, प्रशिस्तपत्रक, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

निवड समितीत सात सदस्यांचा सहभाग
पुरस्कार नि्वड करण्यासाठी सात सदस्यीय समितीची निवड करण्यात आली होती. या निवड समितीने संपूर्ण वाॅर्डची पाहणी करून अहवाल तयार निवड केलेल्या वाॅर्डची यादी सिव्हिल प्रशासनाकडे दाखल केली. निवड समितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. डी. गायकवाड, डॉ. पी. ए. गाडगीळ, डॉ. के. व्ही. शहा, अधिसेविका नसीम शेख, स्वच्छता निरीक्षक शशिकांत राजगुरू यांचा समावेश होता.

बेस्ट वॉर्ड पुरस्काराचे हे आहेत निकष
वाॅर्डात रुग्णांची संख्या किती?, बाथरुम स्वच्छता आहे का?, रुग्णांना दिलेले कपडे कसे आहेत, वॉर्डातील समाेरील स्वच्छता आहे का?, रुग्ण रुग्णांच्या नातेवाईकाबरोबरची वागणूक कशी, नोंदवही अपडेट आहे का?, बायोमेडिकल कचऱ्याचे नियोजन करतात का?, जेवणाच्या रुमची स्वच्छता आहे का?, ड्रेसिंग रुम, तपासणी रुम स्वच्छता आहे का? आदी निकष या पुरस्कारासाठी होते. वॉर्ड निवड करताना सात सदस्यीय समितीने सतत पंधरा दिवस पाहणी केली आहे.

पहिल्यांदाच दिला जात आहे पुरस्कार
^सिव्हिलमध्ये बेस्टहॉस्पिटल वाॅर्ड पुरस्कार स्थापनेपासून पहिल्यांदाच दिला जात असून पुढील काळातही दिला जाईल. प्रथम, द्वितीय तृतीय बरोबर दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार दिल्याने इतर वाॅर्डातील कर्मचारीदेखील चांगल्या पद्धतीने काम करतील, ही पुरस्कार देण्यामागील अपेक्षा आहे. डॉ. डी. डी. गायकवाड, वैद्यकीयअधीक्षक