आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपद, आरक्षण मिळवण्यासाठी भ्रामक चळवळी : भालचंद्र नेमाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘मंत्रिपदापासून ते आरक्षण मिळवण्यापर्यंत अशा अनेक भ्रामक चळवळी अाज झाल्यात. पण, सर्वधर्मांमध्ये एकसंघ असणारी आधुनिक ‘भक्ती’ चळवळ हीच संबध हिंदुस्थानातील आजपर्यंंतची सर्वात मोठीचळवळ आहे. अखंड मानव जातीला जोडून घेण्याची परंपरा भक्ती चळवळीत आहे’, असे प्रतिपादन मराठी सल्लागार मंडळ, साहित्य अकादमीचे संयोजक तथा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पद्मश्री भालचंद नेमाडे यांनी साेमवारी केले.

साहित्य अकादमी व हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र, आंध प्रदेश आणि कर्नाटकातील भक्ती चळवळ : एक आधुनिक दृष्टिकाेन’ या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद््घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरुन बाेलत हाेते. यावेळी साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव, प्राचार्य डॉ. संतोष कोटी आदी उपस्थित होते. नेमाडे म्हणाले,‘समाजाला केंद्रीभूत करुन त्यापद्धतीची संस्कृतीची चालविण्याचा अत्यंत विषारी असा प्रकार सुरु असून तो सर्वधर्मांना त्रासदायक ठरला आहे. पूर्वी आपल्याकडे एकाच पद्धतीचे पोशाख, सण उत्सवाची परंपरा होती. केंद्रित संस्कृतीच्या वाढत्या अतिरेकामुळे सध्याच्या काळात ती परंपरा चालविणे फारच कठिण झाले आहे. कुठेतरी कुणाला त्रास होतो अन्् त्याचे पडसाद आपल्याकडे उमटतात.

संबंधित समाजातील व्यक्तीला पोटभर अन्न मिळत नाही. राहण्यासाठी घरं नसल्याने रस्त्यावर राहतात त्याकडे दुर्लक्ष करणारे लगेच समाजाचा कणवळा आणून दुर्घटना घडवितात. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपण जिथे राहतो तेथील मूळ संस्कृती जोपासावी,’ असे अावाहनही नेमाडे यांनी केले. प्रत्येक धर्मातून काही चांगल्या गोष्टी दुसऱ्या धर्मातील अनुयांनी घेतल्या आहेत. जैन, बौद्ध व िहंदू अशा प्रकारचे रीतीरिवाज समाजात होते. जैन कल्चर हे मदत कल्चर असल्याचा उल्लेख नेमाडे यांनी केला.

भ्रष्टाचार न करणे ही सुद्धा एकप्रकारची देशभक्तीच
हल्ली कुणाच्याही सांगण्यावर देशभक्ती दाखविण्याचा प्रकार सुरु आहे. एखाद्या देशात ज्या पद्धतीने कपडे घालतात, त्याच पद्धतीने कपडे घालणे किंवा सरसंघचालकासारखी घोषणा देणे किंवा एखाद्या सेनेने सांगितल्यासारखे वागणे म्हणजे देशसेवा नाही. प्रामाणिकपणे काम करणे, भ्रष्टाचार न करणे, पैसे न घेणे हीच खरी देशभक्ती, असे नेमाडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...