आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत बँक अपहार, ४५ जणांविरोधात तक्रार अर्ज, कोटी ३७ लाखांचा झाला गैरव्यवहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विसर्जित भारत सहकारी बँकेत कोटी ३७ लाख २६ हजार ५०० रुपयांचा अपहार झाल्याचा तक्रारी अर्ज जेलरोड पाेलिसांत दाखल झाला. सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार यांनी गुरुवारी सायंकाळी हा अर्ज दिला. परंतु संबंधितांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नाही.

एप्रिल ते २५ नोव्हेंबर २०११ या कार्यकाळात हा अपहार झाल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.
त्यावेळचे बँकेचे अध्यक्ष गुलामसाब अब्दुलअजीज बागवान (रा. शुक्रवार पेठ), उपाध्यक्ष संगमेश्वर मल्लिकार्जुन शेट्टी (रा. पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर) यांच्यासह तत्कालीन १९ संचालक, व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी आणि २१ कर्जदार अशा एकूण ४५ जणांच्या विरोधात ही तक्रार आहे. संगनमत करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा ठपका पवार यांनी दिलेल्या अर्जात ठेवण्यात आला अाहे. पोलिसांनी हा अर्ज दाखल करून घेतला. पोलिस अायुक्तांच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

नियमबाह्य आणि असुरक्षित कर्जे दिल्याने बँक आर्थिक अडचणीत आली. अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) वाढल्याने रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे उल्लंघन झाले. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द झाला. त्यामुळे सहकार खात्याने या बँकेवर अवसायक मंडळ नियुक्त केले. त्यानंतर बँकेची चौकशी केल्यानंतर संचालकांनी संगनमत करून अपहार झाल्याचे उघड झाले. परंतु तब्बल वर्षांनी याबाबत तक्रारी अर्ज दाखल झाला आहे.

अर्जुन बँकेबाबतही अिभप्राय मागितला
भारतबँकेसहविसर्जित अर्जुन सहकारी बँकेच्या दोषी संचालक आणि कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी गेल्या महिन्यात दिले होते. अर्जुन बँकेबाबत सरकारी वकिलांकडून अभिप्राय मागितला आहे. त्यानंतर पोलिसांत फिर्याद देईन. बी. सी. पवार, विशेषलेखापरीक्षक