आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा नदीपात्रात मुलीचा मृतदेह आढळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - टाकळीयेथे भीमा नदीच्या पात्रात मंगळवारी (दि. १८) दहा ते बारा वर्षाच्या अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला. त्या मुलीचा घातपात करून पाण्यात फेकून दिले की बुडाली, याचा मंद्रूप पोलिस तपास करत आहेत.
सकाळी महेश चौड्याळ यांच्या शेताजवळ नदीपात्रात काठावर एका लहान मुलीचा मृतदेह तरंगत असताना आढळला. मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी गर्दी झाली होती. संतोष बगले यांनी मंद्रूप पोलिसांना खबर दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित त्रिपाटे, हवालदार सुभाष उकरंडे, अजित उबाळे, राजू कोळी यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मुलीची उंची तीन ते साडेतीन फूट, अंगात काळा रंगाचा टीशर्ट, त्यावर स्पोर्ट असे इंग्रजीत लिहिलेले, काळी चॉकलेटी फुलांची हाफ चड्डी, पायात पैंजण कानात रिंग आहे.