आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबासाहेबांनी समताधिष्ठित समाजाची केली निर्मिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांसाठी नव्हे, सर्व जातीधर्माच्या लोकांचा विचार करून संविधानाची निर्मिती केली. संविधानामुळे माणसाला माणूस म्हणून जगता येऊ लागले आहे. समता मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती बाबासाहेबांनी केली, असे प्रतिपादन भंते ज्ञानज्योती यांनी केले.
मिलिंदनगर येथे भीमसृष्टीचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. भंते ज्ञानज्योती स्थविर यांच्या हस्ते भदन्त सुमेध महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा झाला.
यावेळी महापौर सुशीला आबुटे, आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, उषा शिंदे आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने भीमसृष्टी साकारण्यात आली. त्यात ११ शिल्प तयार करण्यात आले.

सुबोध वाघमोडे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेविका उषा शिंदे, पी. डी. सोनकांबळे, राजा इंगळे, राजा सरवदे, अॅड. संजीव सदाफुले, सुबोध वाघमोडे, प्रमोद गायकवाड, अप्पासाहेब लोकरे, देविदास बाबरे, बी. के. तळभंडारे, सुरेश तळभंडारे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कोण काय म्हणाले
महापौर सुशीला आबुटे : बाबासाहेबांमुळे मला महापौरपदापर्यंत जाता आले.शाहू महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी आणि सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र उभे करण्यासाठी प्रयत्न करू.
नगरसेवक आनंद चंदनशिवे : भीमसृष्टी तयार करण्यासाठी सर्व नगरसेवक पदाधिकारी यांनी मदत केली. सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दीड कोटी निधी मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...