आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसरेत एकाच कुटुंबात सहा जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा- मटण तयार करून उशिरा खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना जेवणातून विषबाधा झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर पाच जणांवर कुर्डुवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री भोसरे येथे ही घटना घडली. सुभाष नवले (वय ७०) असे मृत्यू पावलेल्याचे तर प्रमिला नवले-लटके (२७ ) , सुप्रिया गणेश नवले (२३) , निर्मला सुभाष नवले (६७) , श्रेयस गणेश नवले (२) यांच्यासह आणखी एकाचा उपचार सुरू असलेल्यांत समावेश आहे. 
बुधवारी बाजारातून आणलेले मटण रात्री साठेआठच्या सुमारास शिक्षक गणेश सुभाष नवले यांच्या कुटुंबातील सर्वजण जेवले. त्यानंतर गणेश नवले हे कामानिमित्त लव्हे येथील शेतात गेले. तासाभरानंतर मळमळण्याचा त्रास होऊ लागला. तसेच त्यांना उलट्या झाल्या.त्रास असह्य झाल्याने ते एका खासगी रुग्णालात दाखल झाले. घरातील अन्य पाच जणांनाही त्रास होऊ लागल्याने त्यांनाही गुरुवारी रात्री एकच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर जेवणातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास सुभाष नवले यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हाॅस्पिटलला पाठवण्यात आले.
 
तेथे उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याची कुर्डुवाडी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. जेवणातून विषबाधा झाली आहे. मटण आणून उशिरा खाल्ल्याने हा प्रकार घडला आहे. पाचजणांवर उपचार सुरू आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. डाॅ. चंद्रशेखर साखरे, कुर्डुवाडी 
बातम्या आणखी आहेत...