आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत विडी कामगारांसह उपोषण, जिल्हा कामगार संघटनेचे कारमपुरी यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्रसरकारने विडी उद्योगास धूम्रपान कायद्यात समाविष्ट केल्याने लाखो विडी कामगारांची रोजीरोटी धोक्यात अाली अाहे. त्यामुळे विडी उद्योगास धूम्रपान कायद्यातून वगळावे या मागणीसाठी दिल्ली येथे संसदभवनासमोर दहा हजार महिला विडी कामगारांसह अांदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कामपुरी यांनी केली.
महासंघाने या मागणीसाठी राष्ट्रपतींना दोन लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्याचे ठरविले अाहे. त्यासाठी सहा ते २८ जानेवारी या दरम्यान जानजागृती अभियान राबविण्यात अाले. त्याचा सांगता समारंभ अॅचिव्हर्स मंगल कार्यालय येथे गुरुवारी सकाळी झाला. त्यात कारमपुरी बोलत होते.

सचिव सायबण्णा तेग्गेळी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले. यावेळी कारमपुरी म्हणाले, केंद्र शासनाने विडी उद्योगातील कामगारांच्या रोजरोटीचा विचारच केला नाही. हे सर्व कामगार अाता बेकारीच्या खाईत लोटले जात अाहेत. अगोदरच कामगारांची पिळवणूक होत अाहे. नवीन कायद्यामुळे विडी उद्योग बंद ठेवण्याच्या मानसिकतेत उद्योजक अाहेत. हे रोखण्यासाठी अाता दोन लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार अाहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार राहुल शेवाळे, शरद बनसोडे यांच्यामार्फत प्रयत्न सुरू अाहेत. त्यानंतरही फरक पडला नाहीतर दहा हजार महिलांचे संसदेसमोर उपोषण करण्यात येईल. यावेळी सुनील पवार, पद्माबाई म्हंता, श्रीहरी साका, राहूल गुजर, सायबण्णा तेग्गेळी, श्रीशैल वाघमोडे, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रशांत जक्का, श्रीनिवास बोगा, किशोर नादरगी अादींची उपस्थिती होती.