आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विडी कामगारांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर, केशरी कार्डधारकांच्या याद्या तयार करण्यास प्राधान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विडी कारखानदारांनी संप पुकारल्याने शहरातील विडी कामगारांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर अन्नधान्य वितरण कार्यालयाने अन्नसुरक्षा कायद्यात नसलेले ज्यांचे रेशनकार्ड केशरी आहे, अशा कामगारांची यादी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. शनिवारी शहरातील १६ विडी कारखान्यांत अशा कामगारांची यादी तयार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या यादीस शासनाची मंजुरी घेऊन त्यांना लवकरात लवकर धान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार यांनी दिली.
शनिवारी शहरातील १६ ठिकाणी विडी कामगारांना रकमाचे वाटप करण्यात आले. येथेच अन्नधान्य वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ज्या कामगारांकडे केशरी रेशन कार्ड आहे, त्यांचे नाव, पत्ता, कुटुंबातील सदस्य संख्या ओळखपत्र घेण्यात आले. आणखी दोन दिवस कामगारांची ही माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर ही यादी अंतिम करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याला मंजुरी मिळताच धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे श्री. भालेदार यांनी सांगितले.

^शहरातील १६विडी कारखान्यातून कामगारांना रकमांचे वाटप करण्यात येत होते. त्याचठिकाणी अन्नधान्य वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बसविले. ज्या कामगारांचे रेशन कार्ड केशरी आहे, त्यांचे नाव, कुटुंबातील सदस्य संख्या ओळखपत्र घेण्यास सांगितले आहे. यावरून अंतिम यादी तयार करून शासनाची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतरच विडी कामगारांना धान्य देण्यात येणार येईल. दिनेश भालेदार, अन्नधान्यवितरण अधिकारी.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा करताच अन्नधान्य वितरण कार्यालयात रात्री उशिरापर्यंत झोननिहाय विडी कामगारांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू होते.
विडी कारखानदारांच्या संपामुळे विडी कामगारांना स्वस्त धान्य दुकानातून अन्न देण्याची घोषणा, शहरातील १६ ठिकाणी घेतले गेले नावे, ओळखपत्र