आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा दिवस संप चालणार; मग, चूल कशी पेटणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात एकही उद्योग व्यवस्थित नाही. हजारोंना विडी उद्योग सावरत आहे, या उद्योगामागे लागू नका, सहकार्य करा, दहा दिवस संप करायची वेळ आमच्यावर आली आहे. या दहा दिवसांची मजुरी आम्हाला द्या, आमची चूल कशी पेटणार, असा सवाल महिला विडी कामगारांकडून केला जात आहे.
धूम्रपानविरोधी कायद्यातून विडी उद्योग वगळण्याच्या मागणीसाठी कामगारांकडून सोमवारपासून दहा दिवस बंद जाहीर करण्यात आला आहे. धूम्रपानविरोधी कायद्यातील सुधारित वेष्टण नियमाची अंमलबजावणी एप्रिल २०१६ पासून होत आहे. याला विरोध दर्शवून विडी उत्पादकांनी सोमवार १५ ते २५ फेब्रुवारीपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचे जाहीर केले. दहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करीत आहेत.

विडीकामगारांची उपासमार : आंदोलनकरत असताना विडीकामगारांची मात्र उपासमार होत आहे. विडी उद्योगात एक लाख कामगारांना रोजगार मिळतो. अनेक महिला विडी कामगारांची चूल या विड्यांच्या मजुरीवर अवलंबून आहे. अशा कामगारांची चूल दहा दिवस कशी पेटणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापूर केंद्रशासनाच्या धुम्रपान कायद्यातून विडी उद्योगास वगळावे, या मागणीसाठी विडी कामगार बचाव संयुक्त समिती आणि जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदाेलनानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शांती चौकात रास्ता रोको करण्यात आला. एप्रिल २०१६ पासून ८५ टक्के वैधनिक सुचनाचे लेबल लावण्याचे सक्तीचे केले आहे. अंमलबजावणी केल्यास विडी उत्पादकांना शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या निषेधार्थ १५ ते २४ फेब्रुवारी असे १० दिवस विडी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात पद्माताई म्हंता, श्रीनिवास चिलवेरी, अॅड. सुनील पवार, राहुल गुज्जर, चंद्रकला गुज्जर, विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीहरी साका यांच्यासह महिला विडी कामगारांचा मोठा सहभाग होता. विडी कामगार संयुक्त समितीच्या वतीने गोवर्धन सुंचू यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. या वेळी अप्पाशा म्हेत्रे, भारत परळकर, खाजाहुसेन अत्तार, अंबादास वडलाकोंडा, कस्तुरी मेरगू, छाया पोला, नागनाथ भंडारी, सतीश दासरी, लक्ष्मी गोला, नारायण पोबत्ती, लक्ष्मण यलदंडी आदी उपस्थित होते.