आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटी ७५ लाखांचा निधी मिळूनही काम पूर्ण होईना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर रोडवर जलतरण तलाव (स्विमिंग पुल)उभारणीचे काम गेले चार वर्षे झाले सुरू आहे. निधीची कमतरता असल्याने शासकीय प्रकल्प रेंगाळल्याचे आपण ऐकतो. परंतु निधी असूनही क्रीडा कार्यालयाचा प्रकल्प गेल्या चार वर्षे रेंगाळल्याचे समोर आले आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने दोनदा मुदतवाढ ठेकेदाराला दिली आहे. तरीही काम पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे. डीबी स्टार या विषयावर टाकलेला प्रकाश...
होटगी रस्ता, विजापूर रस्ता जुळे सोलापूर भागातील नागरिकांच्या सोयीसाठी विजापूर रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय)पाठीमागे सुंदरमनगर शेजारी होत असलेला हा शासकीय जलतरण तलाव (स्विमिंग टँग)उभारणीचे काम एप्रिल २०११ मध्ये हाती घेण्यात आले. ऑलिंपिक आकाराचा जलतरण तलाव १८ महिन्यात होणार, असे जिल्हा क्रीडा कार्यालयाने जाहीर केले. पंढरपूरच्या सलीम कन्स्ट्रक्शनला कोटी ७५ लाख रुपयांना मक्ता देण्यात आला. दरम्यानच्या काळात दोनदा या कामाला मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तब्बल चार वर्षांनंतरही काम पूर्ण झाले नाही. तलावाचे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा ठेकेदाराचा आहे. एकदा मुदतवाढ दिल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समितीने त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देताना एक टक्का दंडाची आकारणी केली आहे. आता हे काम डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण करण्याचे आदेश समितीने ठेकेदारास दिले आहेत. या मुदतीही काम होईल का याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

क्रीडासंकुल समितीचा निर्णय घेण्यास विलंब हे प्रमुख कारण
जिल्हाक्रीडा संकुल समितीचा निर्णय घेण्यास होत असलेला विलंब हे जलतरण तलावाचे काम रेंगाळण्याचे प्रमुख कारण आहे. जिल्हा क्रीडा संकुल समीतीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी सचिव हे जिल्हाक्रीडाधिकारी आहेत. परंतु याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे होत आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी सभेची सूचना काढण्याचे काम सचिवांचे आहे. जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यानंतर सभेची सूचना ते काढतात. त्यानंतर ती सभा कधी झाली तर कधी नाही. आणि सभा झाली तरी निर्णय लवकर होणे. निर्णय झाला तरी प्रत्यक्षात कार्यवाहीस विलंब हे प्रकल्प रेंगाळण्याचे कारण आहे. मात्र, स्विमिंग टॅक कधी पूर्ण होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

^या तलावाचे काम पूर्ण होताच डायव्हिंगपटूंसाठी क्रीडा प्रबोधिनी मंजूर होण्याच्या कामास गती येईल. डायव्हिंगची क्रीडा प्रबोधिनी होण्यासाठी जिल्हा राज्य संघटनेचे वतीने प्रयत्न करण्यात येईल. झुबिनअमारिया, अध्यक्ष, जिल्हा जलतरण संघटना

À२०११ मध्ये काम सुरू एप्रिल२०११ मध्ये पंढरपूर येथील सलीम कन्स्ट्रक्शला हा ठेका देण्यात आला. सुरुवातीला कोटी ४७ लाख रुपये आता २.७५ लाख रुपये याचे अंदाजपत्रक झाले आहे.
Àसुरुवातीला पाच लाख अनुदान साडेसहाएकर असलेल्या या जागेवर सुरुवातीला अल्पबचत प्रोत्साहनात्मक अनुदानातून जिम्नॅशियम हॉल बांधण्यासाठी पाच लाखांचे अनुदान मिळाले.
Àकेंद्र शासनाचा क्रीडा प्रकल्प ऑगस्टक्रांती क्रीडा संकुल योजनेतून ५० लाख रुपयांचा निधी स्वांतत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी योजनेतून प्राप्त झाला. सुरुवातीस या जागेवर केंद्र शासनाची क्रीडा प्रकल्प केंद्राची योजना होती.

Àअडीच एकर जागा वसतिगृहास सहाएकर जागेपैकी दीड एकर जागा प्रथम नंतर एक एकर जागा माजी सैनिकांच्या मुले मुलींच्या वसतिगृहासाठी दिली.

Àयोजनाबारगळली... ऑगस्टक्रांती क्रीडा संकुल योजना बारगळल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल योजनेतून जलतरण तलावासाठी ही जागा देण्यात आली.

Àक्रीडा प्रबोिधनीसाठी प्रयत्न राज्यातसोलापूरचे डायव्हिंगपटू आघाडीवर आहेत. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर डायव्हिंगची क्रीडा प्रबोधिनी होण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न केले. अद्याप तरी यास यश आले नाही.

Àतलावाचे ७० टक्के काम पूर्ण ७०लाख ५७ हजार रुपयांच्या कार्यालयीन इमारती काम तलावाशेजारी सुरू. तलावाचे काम ७० टक्के तर इमारतीचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
Àठेकेदारास दुसऱ्यांदा मुदतवाढ १८महिन्यांत पूर्ण करावयाच्या कामाला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यासाठी त्यांना २७ लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे.
Àडिसेंबरअखेरकाम पूर्णचे आदेश एप्रिल२०१४ आणि ऑगस्ट २०१५ मध्ये प्रकल्पास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ठेकेदारास हे काम डिसेंबर २०१५ अखेर पूर्ण करण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे.

आता रिटेनिंग वॉलची अडचण समोर आली
प्रत्येक वेळेस नवीन अडचणी समोर आल्या आहेत. रिटेनिंग वॉल ही नवीन अडचण समोर आली आहे. रिटेनिंग वॉलसाठी स्वतंत्र टेंडर काढायचे का? किंवा आता आहे त्या ठेकेदारास हे काम वाढवून देणे, याचाही निर्णयही आजही झाला नाही. याचा निर्णय झाल्याशिवाय तलावाच्या कडेने जोत्याचा भरावा करता येत नाही. त्यावर पीसीसी क्राँक्रिट करता येत नाही. त्यानंतर कडेच्या फरशा बसवता येत नाहीत आणि जोपर्यंत पीसीसी होत नाही तोपर्यंत तलावाच्या आतील वॉटर प्रूफिंग ट्रिटमेंट करता येत नाही. त्यानंतर आतील टाइल्सही बसवता येत नाही.

आता पूर्ण देखरेख सार्वजनिक बांधकाम विभागाची
याप्रकल्पासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीने खासगी वास्तुविशारद शशिकांत चिंचोळी यांची नियुक्ती केली होती. जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम आल्यानंतर त्यांनी वास्तुविशारदच्या शिफारसीनंतर परत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मत विचारात घेण्याची शिफारस केली. आता जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी खासगी वास्तुविशारद चिंचोळी यांची सेवा संपुष्टात आणून हे पूर्ण काम आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्याचे आदेश दिले आहेत.

अधिकारी बदलले काम चालूच
जिल्हाधिकारी जगदीश पाटील, गोकूळ मवारे प्रवीण गेडाम तसेच क्रीडाधिकारी अरुण पाटील, नरेंद्र पवार हे बदलून गेले. आता जिल्हाधिकारी मुंढे क्रीडाधिकारी बिले यांच्या काळात काम मार्गी लागावे ही अपेक्षा.

जलतरण तलावासाठी लागणारी मशिनरी येऊन धूळखात पडली आहे.तर दुसरीकडे ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा ठेकेदार करत आहे. विजापूर रस्त्यावरील आयटीआयच्या पाठीमागे सुंदरमनगर शेजारी जलतरण तलाव उभारण्यात येत असून गेले चार वर्षे त्याचे काम सुरू आहे.

अडचणी तातडीने सोडवाव्यात
^क्रीडासंकुल समितीस अडचणीबाबत सांगितले आहे. कामातील अडचणीबाबतचे सर्व निर्णय तातडीने झाल्यास सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. श्रीहरी पंचवाडकर, ठेकेदार, सलीम कन्स्ट्रक्शन

^संबंधितठेकेदराला दंड आकारण्यात आलेला आहे. डिसेंबर २०१५ अखेर हा जलतरण तलाव पूर्ण करा, असे आदेश ठेकेदारास दिले आहेत. भाग्यश्री बिले, जिल्हा क्रीडाधिकारी