आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नार्थकोट प्रशालेसमोर दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमाराला घडला. सिद्धेश्वर दत्तात्रय कटकधोंड (वय २५, रा. ढोरगल्ली, लष्कर) याचा मृत्यू झाला अाहे.
दुचाकीवरून तो पार्क चाैकाकडून डफरीन चाैकाकडे जाताना दुचाकी घसरून पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचाराला भाऊ राजू कटकधोंड याने शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळाने मरण पावला. तो चाैपाटीवर वस्ताद म्हणून काम करीत होता. त्याच्या मागे काका, काकू, भाऊ, बहीण, वहिनी असा परिवार अाहे. सिव्हिल पोलिस चाैकीत या अपघाताची नोंद झाली आहे.
कटकधोंड